Success Story Of Dr Azad Moopen Started From One Small Clinic Now Has Rs 8400 Crore Net Worth
भाड्याच्या घरातून सुरू केला व्यवसाय; आज ₹ 8400 कोटींचे मालक, कोण आहेत डॉ. आझाद? By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2024 3:27 PM1 / 6 Success Story Of Dr Azad Moopen : भारतात असे अनेक यशस्वी उद्योजक आहेत, ज्यांनी अतिशय गरिबीतून सुरुवात करत आपले मोठे सामार्ज निर्माण केले आहे. अशाच यशस्वी उद्योजकांमध्ये केरळच्या डॉ. आझाद मूपेन यांचेही नाव येते. दुबईत एका छोट्या क्लिनिकमध्ये आरोग्यसेवा देणाऱ्या मुपेन यांनी विविध देशांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे हजारो कोटींचे साम्राज उभारले आहे. डॉ. मूपेन समाजसेवेतही सक्रिय आहेत. 2 / 6 1987 मध्ये डॉ. मूपेन यांनी दुबईमध्ये एस्टर डीएम हेल्थकेअरची स्थापना केली. आज त्यांची कंपनी अनेक देशांमध्ये 27 हून अधिक मोठी रुग्णालये, 125 क्लिनिक्स आणि 500 फार्मसी शॉप्स चालवते. त्यांची एकूण संपत्ती 8400 कोटी रुपये असून, ते संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत. डॉ. मूपेन यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री आणि प्रवासी भारतीय सन्मानासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 3 / 6 केरळमध्ये जन्मलेल्या डॉ. आझाद मूपेन यांनी एक सामान्य डॉक्टर ते जागतिक दर्जाचा आरोग्यसेवा उद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. 1987 मध्ये त्यांनी दुबईत एक छोटेसे क्लिनिक उघडले. आज त्यांची कंपनी Aster DM Healthcare ही UAE, भारत आणि GCC देशांमध्ये पसरलेले एक मोठे नाव आहे. केरळमध्ये स्थापित मलबार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (MIMS) ही त्यांची मोठी उपलब्धी आहे. दूरदृष्टी, परिश्रम आणि समाजसेवेची तळमळ यामुळे यश प्राप्त झाले आहे.4 / 6 डॉ. आझाद मूपेन यांचा जन्म 1953 मध्ये केरळमधील कल्पकंचेरी येथे झाला. लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मूपेन यांनी एमबीबीएसमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. यानंतर त्यांनी कालिकत मेडिकल कॉलेजमधून एमडीची पदवी घेतली आणि दिल्ली विद्यापीठातून छातीच्या आजारातही डिप्लोमा केला. काही काळ कालिकत मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केल्यानंतर ते 1987 मध्ये दुबईला गेले. तिथे त्यांनी Aster DM Healthcare नावाचे स्वत:चे क्लिनिक सुरू केले. 5 / 6 डॉ. मूपेन यांनी दुबईत दोन बेडरूमचा अपार्टमेंट भाड्याने घेतला होता. तेथून त्यांनी आपल्या दवाखान्याचा पाया घातला. हळूहळू त्यांचे काम वाढत गेले आणि Aster DM Healthcare हे एक प्रसिद्ध नाव बनले. आज कंपनी भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिकेसह नऊ देशांमध्ये 377 हून अधिक आस्थापना चालवते. Aster, Medcare, Access, MIMS आणि DM WIMS सारखे ब्रँड समूहाच्या नेटवर्कचा भाग आहेत. कंपनीत 20,000 हून अधिक लोक काम करतात. लाखो लोकांना आरोग्य सेवा पुरविल्या जातात.6 / 6 डॉ. मूपेन हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नाहीत, तर समाजसेवकही आहे. भारतातील अनेक मोठ्या रुग्णालयांच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. गरजू लोकांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. यामध्ये गल्फ इंडियन लीडरशिप समिटमधील जीवनगौरव पुरस्काराचाही समावेश आहे. भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री आणि प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications