शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 6:10 PM

1 / 10
आयुष्यात यशाच्या उंचीवर पोहचायचं असेल तर प्रत्येक संकटाचा आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. जे आज यशाच्या सर्वाच्च पातळीवर आहेत त्यांनीही त्यांच्या प्रवासात अनेक संघर्ष केले आहेत. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत, उद्योजक प्रत्येकाच्या यशामागे एक कहाणी असते.
2 / 10
आज आम्ही तुम्हाला नारायण मजूमदार यांची कहाणी सांगणार आहोत जे सायकलवरून दूध विक्री करत आज मिल्कमॅन बनले आहेत. त्यांचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल परंतु त्यांच्या कंपनीचं नाव प्रचलित झालंय. नारायण मजूमदार हे भारतातील यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. एका अनुभवी डेअरी टेक्नोलॉजिस्टपासून ते यशस्वी उद्योजक बनलेत.
3 / 10
नारायण मजूमदार हे रेड काऊ डेअरीचे फाऊंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. परंतु त्यांना या उंचीवर पोहचण्यासाठी बरीच वर्ष मेहनत करावी लागली. स्वत:चा बिझनेस सुरू करण्यापूर्वी नारायण मजूमदार यांनी अनेक ब्रँडेड डेअरी कंपन्यांमध्ये काम केले.
4 / 10
इतकेच नाही तर नारायण मजूमदार यांनी कॉलेज शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पार्ट टाईम दूध विक्रीही केली. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत ते घरोघरी जात दूध विक्री करत होते. त्यातून त्यांना दिवसाला ३ रुपये कमाई होत होती. अनेक वर्ष विविध कंपन्यात काम केल्यानंतर नारायण मजूमदार यांनी १९९७ साली स्वत:चा बिझनेस रेड काऊ डेअरी सुरू केले.
5 / 10
नारायण मजूमदार यांनी प्रत्येक दिवशी सायकलवरून गावागावात जात दूध जमा करणं सुरू केले. त्यानंतर ते दूध ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवण्याचं काम ते करत होते. गावातील कच्च्या रस्त्यावर सायकल चालवणं कठीण त्यामुळे अनेकदा त्यांना पायपीटही करावी लागली आहे.
6 / 10
२५ जुलै १९५८ साली पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात नारायण मजूमदार यांचा जन्म झाला. घरात तिघे भाऊ बहिण होते, त्यात नारायण हे दुसऱ्या क्रमांकाचे. त्यांचे वडील शेतकीरी आणि आई गृहिणी होती. १९७५ साली नारायण यांनी डेअरी टेक्नोलॉजीचं शिक्षण पूर्ण केले.
7 / 10
शिक्षणात हुशार असलेले नारायण मजूमदार यांना राज्य सरकारकडून १०० रुपये स्कॉलरशिप मिळायची. वडीलही घरातून दर महिन्याला १०० रुपये द्यायचे. शैक्षणिक खर्चासोबतचं कुटुंबातील हलाखीची परिस्थिती असल्याने त्यांच्या वडिलांना १ एकर शेत विकण्याची वेळ आली
8 / 10
१९८१ मध्ये मदर डेअरीत कामाला सुरुवात केल्यापासून त्यांच्या आयुष्यात वळण आलं. विविध कंपन्यात काम केल्यानंतर नारायण यांनी ७ ते १० लाख गुंतवणूक करून ५०० लीटर क्षमतेचे पहिला मिल्क टँकर खरेदी केला. २००३ मध्ये मजूमदार यांनी रेड काऊ डेअरी नावाची कंपनी सुरू केली.
9 / 10
सध्याच्या घडीला रेड काऊ ही पूर्व भारतातील सर्वात मोठी डेअरी आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल ८०० कोटींहून अधिक आहे. ही कंपनी दूध, दही, तूप, पनीर आणि रसगुल्लाशिवाय दूधापासून बनलेले विविध उत्पादन विक्री करत असते.
10 / 10
रेड काऊ डेअरी कोलकाता मोठं नाव आहे. आज वडिलांच्या उद्योगाला मुलानेही हातभार लावला आहे. आज रेड काऊ डेअरीतून ३२ हजार ते ४ लाख लीटर दूध विक्रीपर्यंत व्यवसाय वाढला आहे. बंगालच्या १२ जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक शेतकरी रेड काऊ डेअरीशी जोडलेले आहेत.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी