शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 9:05 AM

1 / 8
Success Story Saurabh Gadgil: पुण्यातील सौरभ गाडगीळ हे पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे प्रमुख आहेत. भारतातील अब्जाधीशांमध्ये हे नवं नाव आहे. सौरभ यांनी आपली कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर महिन्याभरातच ही कामगिरी केली.
2 / 8
ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार सौरभ गाडगीळ यांची संपत्ती आयपीओनंतर १.१ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ९,२४८ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. चला तर मग सौरभ गाडगीळ यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ.
3 / 8
सौरभ गाडगीळ यांचा जन्म पुण्यातील एका सराफा कुटुंबात झाला. ज्वेलरीच्या व्यवसायात असलेल्या विद्याधर गाडगीळ यांचे ते चिरंजीव आणि पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सच्या पुणे युनिटचे संस्थापक दाजीकाका यांचे नातू आहेत. सौरभ गाडगीळ हे सहाव्या पिढीतील ज्वेलर्स आहेत.
4 / 8
कौटुंबिक व्यवसायात त्यांनी नवे आयाम आणले आहेत. पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सौरभ गाडगीळ, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३.२ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक वेतन मिळालं होतं.
5 / 8
पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड किंवा पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स ही भारतातील सर्वात जुन्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक आहे. याची स्थापना गणेश नारायण गाडगीळ यांनी १८३२ मध्ये केली. गणेश गाडगीळ यांनी एकेकाळी सांगली शहरातील फूटपाथवर सोन्याचे दागिने विकले होते. पुढे त्यांनी पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सची स्थापना केली. आज पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची महाराष्ट्र आणि गोव्यात ३९ रिटेल स्टोअर्स आहेत. कॅलिफोर्नियामध्ये एक स्टोअरही आहे.
6 / 8
प्राथमिक शिक्षणानंतर सौरभ गाडगीळ यांनी १९९८ मध्ये पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) येथून बॅचलर ऑफ कॉमर्स (BCom) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी टेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन, टेक्सास (यूएसए) येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली.
7 / 8
शैक्षणिक आणि व्यावसायिक कामगिरीबरोबरच ४७ वर्षीय सौरभ हे एक कुशल बुद्धिबळपटूदेखील आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. २००० साली सौरभ यांचा विवाह राधिका यांच्यासोबत झाला. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.
8 / 8
एक राष्ट्रीय स्तरावरील माजी बुद्धिबळपटू म्हणून आयुष्यातील तीस चालींच्या आधी विचार करणं ही माझी सवय झाली आहे. ही माझी सवय १९९८ मध्ये कामी आली, जेव्हा मी पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी हाती घेतली, असं सौरभ गाडगीळ यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर लिहिलं आहे.
टॅग्स :businessव्यवसायGoldसोनंjewelleryदागिने