Sukanya Samriddhi Yojana: 65 lakh at the age of 21; Great plan for girls
Sukanya Samriddhi Yojana: बेटी धनाची पेटी! 21 वर्षांची होताच मिळणार 65 लाख रुपये; जबरदस्त योजना By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:12 AM1 / 10जर तुमच्या घरात नुकताच मुलीचा जन्म झालेला असेल किंवा भावा, बहीणीला मुलगी झालेली असेल तर तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारची एक जबरदस्त स्कीम आहे. मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. ती 18 वर्षांची झाल्यावर तिला 65 लाख रुपयांपर्यंतचा फायदा तुम्ही मिळवून देऊ शकता. (Sukanya Samriddhi Yojana in Marathi)2 / 10जर तुमच्या घरात 10 वर्षांपेक्षा लहान वयाची मुलगी असेल तर दर महिन्याला तिच्या नावे थोडी थोडी रक्कम बाजुला काढून वर्षाला एकत्रित पैसे भरून तिचे भविष्य सुखकर करू शकता. मोदी सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) तुम्ही पैसे गुंतवून मुलगी मोठी झाल्यावर तिला हे पैसे मिळू शकतील. हा पैसा तिचे लग्न किंवा शिक्षण यासाठी वापरता येईल. 3 / 10सुकन्या समृद्धी योजनेत आपल्याला ७.६ टक्क्यांचं व्याज मिळतं. हे व्याज दर चार महिन्यांनी रिवाईज केलं जातं.आयकर अधिनियमच्या कलम ३७० सी अंतर्गत तुम्हाला दीड लाखआंपर्यंत गुंतवणूकीवर सूट मिळते. 4 / 10ही योजना पोस्टाकडून सुरु करण्यात आली आहे. बँकांमध्येही याचा पर्याय आहे. ही योजना 2015 मध्ये मोदी सरकारने मुलीला शिकवा, मुलगी वाचवा योजनेत सुरु केली होती. या योजनेतून तुम्ही 250 रुपयांत खाते सुरु करू शकता. तसेच वर्षाला 15 लाखांपर्यंतची रक्कम गुंतवू शकता. 5 / 10एका मुलीच्या नावे एक आणि एक पालक दोन मुलीचे खाते उघडू शकतो. जर मुली तिळ्या किंवा जुळ्या असतील तर तिसऱ्या मुलीलाही याचा लाभ मिळेल. 10 वर्षांपर्यंत हे खाते उघडता येते. 6 / 10सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षांनी मॅच्युअर होते. परंतू या योजनेत 15 वर्षेच पैसे भरायचे असतात. मुलगी 21 वर्षांची झाली की तिला हे पैसे मिळतात. 7 / 10या योजनेत पैसे गुंतविले की, जमा रक्कम, व्याजावरील कर माफ केला जातो. मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त असते. आयकर नियमानुसार तुम्हाला वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या रकमेवर करमाफी मिळते. त्यात ही रक्कम पकडली जाते. 8 / 10सुकन्या समृद्धी योजनेनुसार खाते उघडण्यासाठी अर्ज करताना पोस्ट ऑफिस किंवा बँकेत मुलीचे जन्म प्रमाणपत्र द्यावे लागेल. याशिवाय आई-वडिलांचे पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन पैकी एक ओळखपत्र द्यावे लागेल. याशिवाय पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. 9 / 10ही योजना मुलगी 18 वर्षांची झाली की किंवा हायस्कूल पास झाली की मध्येच बंदही करता येते. मात्र, जमा झालेल्या रकमेवरील व्याज आणि रक्कम हे मुलगी 21 वर्षांची झाली कीच मिळणार आहे. 10 / 10मुलीचे लग्न 18 वर्षांनी असेल तरी देखील रक्कम काढू शकता किंवा तिच्या शिक्षणासाठी 18 वर्षांची झाल्यावर 50 टक्के रक्कम काढू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications