शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सरकारच्या 'या' निर्णयानंतर नव्या आर्थिक वर्षात मुलीच्या नावे २५० रुपयांत सुरू करा खातं; होणार १५ लाखांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 5:14 PM

1 / 8
सुकन्या समृद्धी योजनेसारख्या (Sukanya Samriddhi Yojana) छोट्या बचत योजनांसाठी सरकारने पुन्हा एकदा व्याजदर (Interest Rates) स्थिर ठेवले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेवर सरकार पूर्वीप्रमाणेच वार्षिक ७.६ टक्के दर व्याज देणार आहे.
2 / 8
सरकारच्या निर्णयानंतर येत्या एप्रिल-जून तिमाहीसाठी हेच व्याजदर कायम राहतील. म्हणजेच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला पुढील तिमाहीपर्यंत अधिक व्याज मिळत राहील. अशा परिस्थितीत, नवीन आर्थिक वर्षात, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकता.
3 / 8
कन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींसाठी सुरू करण्यात आलेली एक छोटी बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना खात्याअंतर्गत १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालक हे खातं उघडू शकतात.
4 / 8
या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करू शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्चासाठी थोडी मदत मिळते. यामध्ये एका मुलीच्या नावाने एकच खाते उघडता येते. जर तुम्हाला दोन मुली असतील तर दोघांच्या नावे स्वतंत्र खाते उघडावे लागेल.
5 / 8
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत उघडता येते. या योजनेंतर्गत, १० वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींचं खातं किमान २५० रुपये जमा करून उघडता येऊ शकते.
6 / 8
चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतील. खाते उघडण्यासाठी, तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेत फॉर्मसह जमा करावे लागेल. याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र म्हणजेच पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी डॉक्युमेंट द्यावं लागेल.
7 / 8
सुकन्या समृद्धी खाते खाते उघडण्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी किंवा मुलगी १८ वर्षांची झाल्यावर लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेच्या १ महिना आधी किंवा तीन महिन्यांनंतर) हे खातं मॅच्युअर होतं. सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ७.६ टक्के व्याज दिलं जात आहे.
8 / 8
तुम्ही या योजनेत दरमहा ३००० हजार रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास, तुम्हाला १४ वर्षांनंतर वार्षिक ७.६ टक्के कंपाऊंडिंगच्या हिशोबानं १,११,५७४ रुपये मिळतील. २१ वर्षे म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे १५,२२,२२१ रुपये असेल.
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसाय