Take home the top selling model of Maruti Suzuki Baleno for just 1 lakh see loan details finance emi
केवळ १ लाख देऊन घरी न्या Maruti Suzuki Baleno चं टॉप सेलिंग मॉडेल, पाहा लोन डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 1:30 PM1 / 6Maruti Suzuki Baleno Zeta Petrol Finance Details: मारुती सुझुकी बलेनो ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही कार तिच्या प्रिमियम लूक आणि चांगल्या मायलेजसह लेटेस्ट फीचर्ससाठी ओळखली जाते. मारुती सुझुकीच्या नेक्सा डीलरशिपवर उपलब्ध असलेली ही कार तुम्ही सहजरित्या ईएमआयवर घेऊ शकता.2 / 6Baleno Zeta हे सर्वाधिक विकले जाणारे व्हेरिअंट आहे आणि जर तुम्हालाही या दिवसात या कारसाठी फायनॅन्स करायचे असेल तर ते अगदी सोपे आहे. तुम्ही फक्त 1 लाख रुपये डाऊनपेमेंट करून Baleno घरी आणू शकता. यानंतर, तुम्ही एका उर्वरित रकमेचं कर्ज घेऊ शकता आणि नंतर ठराविक व्याज दराने दरमहा ईएमआय भरू शकता.3 / 6मारुती सुझुकी बलेनो सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या 4 ट्रिम लेव्हलमध्ये एकूण 9 व्हेरिअंटमध्ये ऑफर केली जाते. याची किंमती 6.49 लाख ते 9.71 लाख रुपये, एक्स-शोरूम इतकी आहेत. ही कार प्रीमियम हॅचबॅक पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.4 / 6मारुती सुझुकी बलेनोचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल, बलेनो झेटा मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8.26 लाख रुपये आहे. या कारची ऑन-रोड किंमत 9,35,946 रुपये आहे. मारुती बलेनो झेटा फायनान्ससाठी किमान डाउनपेमेंट 1 लाख रुपये आहे.5 / 6मारुती बलेनोचे मायलेज पेट्रोलसाठी 22.35 kmpl आणि CNG व्हेरिअंटसाठी 30.61 km/kg आहे. बलेनोच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, रिव्हर्स कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, कीलेस एंट्री आणि एकाधिक एअरबॅग्ज यासह अनेक विशेष फीचर्स देण्यात आली आहेत.6 / 6Maruti Suzuki Baleno Zeta व्हेरियंटसाठी 1 लाख रुपये (ऑन-रोड चार्जेस आणि पहिल्या महिन्याचा EMI) डाउनपेमेंट केल्यानंतर तुम्हाला 8,35,946 रुपयांचे चे कर्ज घ्यावे लागेल. जर व्याज दर 9 टक्के असेल आणि कर्जाची मुदत 5 वर्षांपर्यंत असेल, तर पुढील 60 महिन्यांसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 17,353 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मारुती बलेनो झेटा व्हेरियंट तुम्ही ईएमआयवर घेतले तर तुम्हाला व्याजाच्या रकमेपोटी 2 लाख रुपये भरावे लागतील. आणखी वाचा Subscribe to Notifications