Take Joint Home Loan with Wife, Low Interest, More Amount; There will be many benefits
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 12:02 PM1 / 9आपल्याकडे अनेकांचे स्वत:चे घर असावे हे स्वप्न असते, यासाठी आपण सर्वजण कष्ट करत असतो. बऱ्याच वर्षांची कमाई आपण बचत करतो. पण तरीही आपल्याला एवढी रक्कम बचत करता येत नाही. 2 / 9यासाठी आपण होमलोनचा पर्याय पाहत असतो. होमलोनची सुविधा अनेक बँकांकडे असते. 3 / 9होमलोन घेताना तुम्ही ज्वाइंट होमलोनचा विचार करू शकता. हे सामान्य गृहकर्जापेक्षा सहज उपलब्ध आहे. 4 / 9तुम्ही कोणाशीही ज्वाइंट होमलोन घेऊ शकता. पण, जर महिला ज्वाइंट अर्जदार असेल तर अधिक फायदे मिळतात. पती-पत्नी ज्वाइंट कर्ज घेऊ शकतात. जर पुरुष विवाहित नसेल, तर तो त्याच्या पालकांना किंवा बहिणीला देखील अर्जदार बनवू शकतो.5 / 9तुम्ही तुमच्या पत्नीसोबत ज्वाइंट होमलोनसाठी अर्ज केल्यास, तुम्ही दोघेही कलम 80C अंतर्गत आयकर लाभांचा दावा करू शकता. दोन्हीच्या प्रीपेमेंटवर, व्याजावर 2 लाख रुपयांची स्वतंत्र कर सवलत असेल. एका वर्षात मूळ रकमेवर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळू शकते.6 / 9अनेक बँका आणि NBFC महिला खरेदीदारांना सवलतीच्या व्याजदरावर होमलोन देतात. हे दर सहसा 0.05 टक्के इतके कमी असतात. जर महिलेचे नाव असेलतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कात काही सूट आहे. हे सर्व फायदे तेव्हाच मिळतील जेव्हा महिला देखील मालमत्तेची सह-मालक असेल.7 / 9पहिल्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी, होमलोनच्या व्याजावर 50,000 रुपयांची अतिरिक्त वजावट उपलब्ध आहे. पण यासाठी कर्जाची रक्कम 35 लाखांपेक्षा जास्त नसावी आणि मालमत्तेची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त नसावी. व्याज पेमेंटवर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट मिळविण्यासाठी, मुद्रांक शुल्काचे मूल्य देखील 45 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.8 / 9ज्वाइंट होमलोन घेतल्याने, दोन्ही अर्जदारांचा क्रेडिट स्कोअर देखील सुधारतो, कारण होमलोन हे सर्वात सुरक्षित कर्ज मानले जाते. जर तुमचा जोडीदार देखील व्यावसायिक किंवा नोकरीला असेल, तर त्याच्यासोबत गृहकर्ज घेतल्यास, EMI चा बोजा तुमच्यापैकी एकावरही पडणार नाही.9 / 9यामध्ये कर्जाची रक्कमही जास्त असू शकते. जर पती-पत्नी दोघेही व्यावसायिक किंवा नोकरी करत असतील, तर जॉइंट होम लोन हा त्यांचा सर्वोत्तम पर्याय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications