Taking a home loan? Should interest rates be fixed or floating ?, see how to decide
होम लोन घेताय? व्याजदर फिक्स ठेवावा की फ्लोटिंग?, पाहा कसं ठरवाल By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:09 PM1 / 7घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक बँकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना व्याजदर किती आहे यावरून निर्णय घेतला जातो. मात्र, व्याजदराबाबत नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की स्थिर दराने गृहकर्ज घ्यायचे की फ्लोटिंग रेटवर. नेमका काय निर्णय घ्यावा हे जाणून घेऊ.2 / 7फ्लोटिंग कर्जाचा दर बाजारानुसार कमी-जास्त होतो. आरबीआयने रेपो दरात वाढ केली की, बँका कर्ज महाग करतात. त्यावेळी तुमच्याही कर्जाच्या व्याजदरात वाढ होते. खालील परिस्थितील तुम्ही तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेण्याचा विचार करू शकता.3 / 7थिर होम लोनचे दर सामान्यतः फ्लोटिंग दरापेक्षा किंचित जास्त असतात. जर हा फरक जास्त असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. याच्या मदतीने व्याजाचे पैसे वाचवू शकता.4 / 7येत्या काळात व्याजदर कमी होऊ शकतात, असे वाटते तर किंवा कर्जाच्या प्री-पेमेंटच्या बाबतीत तुम्हाला दंड टाळायचा असेल तरीही तुम्ही फ्लोटिंग व्याजदर निवडू शकता.5 / 7स्थिर दराच्या गृहकर्जामध्ये, कर्ज घेताना व्याजदर निश्चित केला जातो आणि कर्जाच्या संपूर्ण कालावधीत तोच राहतो. खालील परिस्थितीनुसार तुम्ही स्थिर दराच्या गृहकर्जाची निवड करू शकता.6 / 7जर तुम्हाला वाटत असेल की, आता व्याजदर कमी होणार नाही. व्याजदर खाली आला आहे व तुम्हाला तेच दर कायम ठेवायचे आहेत. तुमच्या कर्जासाठी सध्याच्या व्याजदराने तयार होणारा ईएमआय योग्य असेल तर तुम्ही स्थिर दर निवडू शकता.7 / 7जर तुम्ही अजूनही गोंधळात असाल तर तुम्ही दोन्हीचे संयोजन निवडू शकता ते म्हणजे, थोडे स्थिर आणि थोडे फ्लोटिंग हा पर्याय. तुम्ही सध्या कर्जाचा हप्ता भरत असल्याने, तुम्ही गृहकर्जासाठी निश्चित दराचे गृहकर्ज निवडू शकता आणि त्यानंतर उर्वरित मुदतीसाठी तुम्ही फ्लोटिंग पर्याय निवडू शकता. या स्विचिंगसाठी बँका काही शुल्क आकारू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications