शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झटपट लोन, 2 मिनिटांत अकाऊंटला पैसे घेताय; झटका बसण्यापूर्वी हे वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:39 AM

1 / 9
तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल किंवा एखाद्या कंपनीत काम करत असताना तुमचा पगार उत्तम असल्यास काही खासगी किंवा कॉर्पोरेट बँकांकडून तुम्हाला लोनसाठी फोन सुरू होतात.
2 / 9
तुमच्या बँक अकाऊंटचा अभ्यास करुन, किंवा सॅलरी अकाऊंटची माहिती घेऊन, डेटा गोळा करत या बँकांचे प्रतिनिधी फोनवरुन तुमच्यापर्यंत पोहोचतात. सातत्याने फोन करुन तुम्हाला लोनच्या ऑफर्स देतात.
3 / 9
इंन्स्टंट लोन, २ मिनिटांत ५ लाखांपर्यंतचे लोन मिळवा. कुठल्याही कागदपत्रांशिवाय बँक खात्यात पैसे जमा होतील, असे पर्यात देत कर्ज देऊ केले जाते. मात्र, हे कर्ज घेताना आपण काळजी घ्यायला हवी.
4 / 9
कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला झटपट लोन मिळत असेल तर ते कुणाला नको असतं. पण, दोन मिनिटांत लोन घेण्याचा मोह तुम्हाला चांगलाच महागातही पडू शकतो.
5 / 9
वैयक्तिक कर्जासाठी कर्ज, क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज, ओव्हरड्राफ्ट, बाईक किंवा कारसाठी कर्ज आणि ब्रिज लोन इत्यादी अल्प मुदतीच्या कर्जाच्या श्रेणीत येतात. त्यासाठीच, शक्यतो हे लोन देण्यात येतं.
6 / 9
या प्रकारची कर्ज देखील असुरक्षित असतात आणि त्याची परतफेड वेळेत केली नाही तर त्याचे धोकेही मोठे असतात. त्यामुळेच, इंस्टंट लोन किंवा 'टू मिनिट लोन'मधील जोखीम आणि तोटे आधी समजून घेतले पाहिजे.
7 / 9
अशाप्रकारचे कर्ज न फेडल्यास तुम्ही डिफॉल्ट लिस्टमध्ये जाऊ शकता. हे लोन खूप जोखमीचे असतात. त्यामुळे याचा एकही हप्ता चुकवून चालत नाही. एवढंच नाही तर हप्ता चुकल्यावर लागणाऱ्या दंडाची रक्कम ही खूप जास्त असते.
8 / 9
लोनसाठी अर्ज करतानाच अटी आणि नियम नीट वाचून आणि समजून घ्या. ज्यामुळे लोन फेडताना तुम्हाला त्रास होणार नाही. शॉर्ट टर्म लोनचं टेन्यूअर कमी असतं.
9 / 9
त्यामुळे त्याचा EMI जास्त असतो. यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं कधीकधी तर भरायला पैसेही उरणार नाहीत. कर्ज आणि EMI चा बोजा खूप जास्त असतो. त्यामुळे, लोन पूर्वी लोन फेडण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती घ्या.
टॅग्स :bankबँकMobileमोबाइलbusinessव्यवसाय