शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Entrepreneurs : टाटा, अंबानी, महिंद्रा आणि..., या भारतीय उद्योजकांनी खरेदी केल्यात इंग्रजांच्या कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 4:40 PM

1 / 8
परवा १५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या घटनेला ७७ वर्षे पूर्ण होतील. दरम्यान, एकेकाळी ब्रिटिशांचा गुलाम असलेला भारत आता, ब्रिटपेक्षाही अधिक प्रगती करू लागला आहे. तसेच ज्या इंग्रजांनी एकेकाळी भारताचं शोषण केलं होतं. त्याच इंग्रजांच्या कंपन्या भारतीय उद्योगपती खरेदी करत आहेत. या यादीमध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, सुनील मित्तल आदींचा समावेश आहे. ब्रिटीश कंपन्या खरेदी करणाऱ्या भारतीय उद्योगपतींमधील प्रमुख उदाहरणं पुढील प्रमाणे आहेत.
2 / 8
भारती एअरटेलचे मालक सुनील मित्तल यांचीं कंपनी भारती एंटरप्रायझेसने ब्रिटनमधील एका मोठ्या टेलिकॉम कंपनीमध्ये भागिदारी खरेदी करण्याची तयारी केली आहे. सुनील मित्तल यांची कंपनी ब्रिटनमधील दूरसंचार कंपनी असलेल्या बीटी ग्रुपमधील २४.५ टक्के भागीदारी खरेदी करणार आहे. भारती एअरटेल हा व्यवहार ४ अब्ज डॉलर म्हणजेच ३४ हजार कोटी रुपयांमध्ये पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.
3 / 8
देशातील प्रख्यात उद्योग समूह असलेल्या टाटा कंपनीनेही ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. टाटा समुहाने ब्रिटनमधील लक्झरी कार निर्मात्या जॅग्वार लँड रोव्हरचा मालकी हक्क मिळवलेला आहे. एवढंच नाही तर टाटा स्टिलचा एक प्लँटही ब्रिटनमध्ये आहे. याशिवाय टाटाने गतवर्षी इलेक्ट्रिक कार बॅटरीची फॅक्टरी उघडण्यासाठी ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
4 / 8
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनेही ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी कंपनीने ब्रिटनमधील टेक्नॉलॉजी कंपनी फेरडियॉन लिमिटेडची १३५ कोटी डॉलर रुपयांना खरेदी केली होती. तर २०१९ मध्ये मुकेश अंबानी यांनी ब्रिटनमधील २५९ वर्षे जुनी टॉय कंपनी हॅमलेस मधील १०० टक्के भागिदारी खरेदी केली होती.
5 / 8
अझीम प्रेमजी यांच्या विप्रोनेसुद्धा ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. विप्रोने २०२२ मध्ये यूकेमधील कॅपको नावाची कंपनी १.४५ अब्ज डॉलर रुपयांना खरेदी केली होती.
6 / 8
तर आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनेसुद्धा ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणता गुंतवणुक केलेली आहे. आनंद महिंद्रा ह्यांनी १८६१ मद्ये बर्मिंघममध्ये सुरू झालेल्या बीएसए मोटारयायकल कंपनीची खरेदी केली होती.
7 / 8
दरम्यान, अनिल अग्रवाल यांच्या वेदांता रिसोर्स कंपनीचं मुख्यालय तर लंडनमध्येच आहे. अनिल अग्रवाल हे लंडनमध्येच वास्तव्याला असतात. त्याशिवाय सिप्ला, ग्लेनमार्कसारख्या मोठ्या औषधनिर्माता कंपन्यांचीही ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे.
8 / 8
भारतामधील आयशर मोटर कंपनीने १९९४ मध्ये ब्रिटनमधील मोटारसायकल निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डचं अधिग्रहण केलं होतं.
टॅग्स :businessव्यवसायIndiaभारतEnglandइंग्लंडIndependence Dayस्वातंत्र्य दिनRatan Tataरतन टाटाMukesh Ambaniमुकेश अंबानीAnand Mahindraआनंद महिंद्रा