tata elxsi share turned 1 lakh ruees into 2 crore rupee stock market 20000 percent return
TATA च्या या शेअरनं १ लाखांचे केले २ कोटी; दिले २०००० टक्क्यांपेक्षाही जास्त रिटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 2:07 PM1 / 6टाटा समूहाच्या एका शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. हा शेअर टाटा एलेक्सी या कंपनी आहे. टाटा एलेक्सीच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना 20000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 2 / 6गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 40 रुपयांवरून 7500 रुपयांपर्यंत वाढले आहेत. टाटाच्या या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9420 रुपये आहे. कंपनीच्या समभागांनी या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना सुमारे 33 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 4107.05 रुपये आहे.3 / 620 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर टाटा एलेक्सीचे शेअर्स 38.88 रुपये होते. कंपनीचे शेअर्स 14 जुलै 2022 रोजी NSE वर 7819.05 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते.4 / 6टाटा एलेक्सीच्या शेअर्सनं या कालावधीत गुंतवणूकदारांना 20,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 20 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्यानं गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर सध्याची रक्कम 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.5 / 6टाटा एलेक्सीच्या शेअर्समध्ये गेल्या दोन वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. 8 मे 2020 रोजी कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 771.50 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीचे शेअर्स 14 जुलै 2022 रोजी NSE वर 7819.05 च्या पातळीवर ट्रेड करत होते. 6 / 6जर एखाद्या व्यक्तीने 26 महिन्यांपूर्वी टाटा अलेक्सीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या त्याचं मूल्य 10.13 लाख रुपये झाले असते. Tata Alexi चे मार्केट कॅप 48,300 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications