tata elxsi stock gives record-breaking returns of 6,000 percent Rs 1 lakh turns 62. 57 lakh
टाटाच्या 'या' स्टॉकनं केली कमाल, दिला 6000 टक्क्यांचा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदार मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 6:38 PM1 / 6शेअर बाजारामध्ये गेल्या दशकात ज्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला, त्यांत एक नाव म्हणजे, टाटा एलेक्सी लिमिटेड (Tata Elxsi Limited). या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या 10 वर्षांत तब्बल 5000 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.2 / 6अर्थात, गेल्या दहा वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत ठेवी असेल, ते गुंतवणूकदार आज मालामाल झाले असतील. तर जाणून घेऊयात, कशी आहे कंपनीची कामगिरी?3 / 6कशा पद्धतीने वाढत गेला शेअरचा दर? - एनएसईवर (NSE) 9 नोव्हेबंर 2012 रोजी कंपनी शेअरची किंमत 109.78 रुपये एवढी होती. ती शुक्रवारी (28 ऑक्टोबर 2022) रोजी 6870 रुपयांवर क्लोज झाली. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 6157.97 टक्क्यांची उसळी दिसून आली आहे. 4 / 6ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, त्यांच्या शेअरची किंमत आता 700.23 टक्क्यांनी वाढली आहे. गुंतवणूकदारांसाठी गेले वर्षही जबरदस्त राहिले आहे. या कठीन काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव 14.99 टक्क्यांनी वाढला आहे.5 / 6या वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार दिसून आला. मात्र अशा परिस्थितीतही टाटा एलेक्सीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2022 मध्ये टाटाच्या या स्टॉकने गुंतवणूकदारांना 16.57 टक्के एवढा परतावा दिला आहे. दहा वर्षांपूर्वी, ज्या गुंतवणूकदारांनी टाटा एलेक्सीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, आता त्याचे 62.57 लाख रुपये झाले सतील.6 / 6टाटा एलेक्सीने 1 जानेवारी 1999 रोजी शेअर मार्केटमध्ये डेब्यू केले होते. तेव्हापासून आतापर्यंत कंपनी शेअर्सच्या किंमतीत 19,528 टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे. कंपनीची 52 आठवड्यांतील उच्च पातळी 10,760 रुपये आहे. तसेच, 52 आठवड्यांतील खालची पातळी 5263 रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications