शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA चा धुमाकूळ! Best Trusted Brand तब्बल ३६ कंपन्यांचा समावेश; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 3:22 PM

1 / 9
आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात कार्यरत असून, विविध क्षेत्रातील कंपन्या दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. अगदी भारतीय बाजारपेठेपासून ते शेअर मार्केटपर्यंत टाटाच्या अनेक कंपन्या कमाल कामगिरी करत आहेत.
2 / 9
TATA ग्रुप देशातील सर्वांत मोठा औद्योगिक समूह असून त्यात ११० हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. टाटा समूहाची स्थापना १९०७ मध्ये जमशेदपूर, झारखंड येथे झाली आणि आताच्या घडीला समूह पाच खंडांमध्ये पसरलेला आहे.
3 / 9
टाटा समूहाचे असे ३६ ब्रँड आहेत जे ग्राहकांमध्ये सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहेत. अलीकडेच टीआरए रिसर्चने देशभरात एक सर्वेक्षण केले, यामध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त ब्रँड्सचा समावेश असून, केवळ TATA ग्रुपचे ३६ ब्रँड सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहेत.
4 / 9
TATA चा टायटन हा सर्वांत विश्वासार्ह ब्रँड आहे. ज्यांच्या ब्रँड रँकिंगमध्ये ३३ वरून ८ व्या स्थानावर वाढ झाली आहे. सन २०२२ साठी जाहीर झालेल्या यादीत डेल, Mi मोबाईल आणि सॅमसंग मोबाईल हे टॉप तीन ब्रँड आहेत.
5 / 9
टीआरए रिसर्चचे सीईओ एन चंद्रमौली म्हणाले की, याआधी या यादीत टाटा ब्रँड्सचा समावेश असायचा, पण आता ही संख्या ३६ वर गेली आहे. TATA च्या इतर उत्पादनांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा सॉल्ट ८ स्थानांनी झेप घेऊन १३व्या स्थानावर पोहोचला आहे.
6 / 9
याशिवाय तनिष्क ३४ स्थानांची झेप घेत १४व्या स्थानी पोहोचली आहे. याशिवाय TATA मोटर्स या यादीत २८व्या स्थानावर आहे. या यादीत अलीकडे जोडलेल्या ब्रँड्समध्ये टाटा संपन्न मसाले आणि टाटा कॉपर प्लस वॉटर प्युरिफायरचा समावेश आहे.
7 / 9
गेल्या दोन वर्षांत टाटाने अनेक उप-उत्पादने तयार करण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि ग्राहकांची पहिली पसंती बनली. टाटाच्या अंब्रेला ब्रँडलाही ग्राहकांनी खूप पसंती दिली आहे.
8 / 9
टाटा व्यतिरिक्त, TRA रिसर्चमध्ये गोदरेज, अमूल, LG, M&M, सॅमसंगचे प्रत्येकी आठ आणि रिलायन्सचे सात ब्रँड समाविष्ट आहेत. डेलने सलग तिसऱ्या वर्षी भारतातील सर्वांत विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपली घोडदौड सुरू ठेवली आहे.
9 / 9
त्यानंतर Mi Mobiles आणि Samsung Mobiles अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. टीआरएच्या गेल्या वर्षीच्या संशोधन अहवालात तिन्ही ब्रँड्सने अव्वल स्थान पटकावले होते, जे अजूनही अबाधित आहे.
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटा