शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA चा मेगा प्लान! अंबानी, बेजोस यांना टक्कर देणार; ‘या’ कंपनीत गुंतवले ५,८८२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 5:59 PM

1 / 9
आताच्या घडीला TATA ग्रुप एकदम फॉर्मात आहे. मुकेश अंबानीच्या रिलायन्स, जोस बेजोस यांच्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांना जोरदार टक्कर देण्याची तयारी टाटा समूहाने सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
2 / 9
TATA ग्रुपने यासाठी आपल्याच एका कंपनीत तब्बल ५ हजार ८८२ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती देण्यात आली आहे. टाटा सन्सची ई-कॉमर्स कंपनी असून, एका आर्थिक वर्षातील टाटाची ही सर्वांत मोठी गुंतवणूक असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
TATA सन्सची ई-कॉमर्स कंपनीचे नाव टाटा डिजिटल असून, यामध्ये टाटा समूहाने मोठी गुंतवणूक केली आहे. अतिरिक्त निधीसह टाटा समूहाची टाटा डिजिटलमधील गुंतवणूक ११,८७२ कोटी रुपये आहे, असे टाटा समूहाने म्हटले आहे.
4 / 9
एका अहवालानुसार, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दाखल केलेल्या फायलींगमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, टाटा डिजिटलच्या बोर्डाने ३० मार्च रोजी अधिकाराच्या आधारे १० रुपये शेअरप्रमाणे ५.८८ अब्ज रुपयांचे पूर्ण पेड इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यास मान्यता दिली होती.
5 / 9
हे शेअर्स ५,८८२ कोटी रुपयांचे असतील. टाटा डिजिटलची होल्डिंग कंपनी टाटा सन्सला ते जारी केले जातील. टाटा डिजिटलला मागील नऊ महिन्यांत टाटा सन्सकडून अनेक टप्प्यांत सदर निधी मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
6 / 9
दरम्यान, अगदी अलीकडे टाटा समूहाने ७ एप्रिल रोजी त्यांचे सुपर अॅप टाटा न्यू लाँच केले आहे. या अॅपवर वापरकर्त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एअरलाइन्स बुकिंगसह अनेक सुविधा मिळतील.
7 / 9
हे टाटा समूहाच्या एअर Asia, BigBasket, Croma, Starbucks, Tata 1mg, Tata Cliq, Tata Play आणि Westside सारख्या सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुलभ प्रवेश आणि सेवा देते.
8 / 9
दुसरीकडे टाटा समूहातील अनेक कंपन्या आताच्या घडीला जबरदस्त कामगिरी करत असून, अनेकांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास टाटावर वाढल्याचे म्हटले जात आहे.
9 / 9
टाटा समूहातील विविध कंपन्यांच्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना भन्नाट रिटर्न मिळाले असून, ते मालामाल झाल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Tataटाटा