शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATAच्या या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस, दिला 100000% हून अधिकचा परतावा; रचला नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 11:57 AM

1 / 7
टाटा समूहाची कंपनी टायटनच्या शेअर्सने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. टायटनचा शेअर मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर 2840.60 रुपये या ऑल टाइम हाईवर पोहोचला आहे. टायटनच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
2 / 7
टायटन कंपनीचा शेअर 3 रुपयांवरून थेट 2800 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात टायटनच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 100000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, टायटन हा दिग्गज गुंतवणूकदार राहिलेल्या राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरिट स्टॉक रहिला आहे.
3 / 7
1 लाख रुपयांचे झाले 11 कोटींहून अधिक - टायटन कंपनीचा शेअर 9 मे 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) 2.57 रुपयांवर होता. तो 30 मे 2023 रोजी 2840.60 रुपयांवर पोहोचला. या काळात टायटनच्या शेअरने तब्बल 109000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला.
4 / 7
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 9 मे 2003 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर त्यांची किंमत आता 11.05 कोटी रुपये झाली असती. या कॅलक्युलेशनमध्ये टायटनने जारी केलेले बोनस शेअर्सचा समावेश करण्यात आलेला नाही.
5 / 7
5300% ची तेजी, 15 वर्षांत शेअरने केली कमाल - टायटनचे शेअर्स गेल्या 15 वर्षात 5385% ने वधारले आहेत. 4 जुलै 2008 रोजी कंपनीचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 51.20 रुपयांवर होता. तो 30 मे 2023 रोजी 2840.60 रुपयांवर पोहोचला. जर एखाद्याने 4 जुलै 2008 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज त्याचे 55.48 लाख रुपये झाले असते.
6 / 7
झुनझुनवाला कुटुंबाकडे 4.6 कोटीहून अधिक शेअर्स - राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 46945970 शेअर्स अथवा 5.29 टक्के हिस्सेदारी आहे. हिस्सेदारीचा हा डेटा मार्च 2023 तिमाहीपर्यंतचा आहे. झुनझुनवाला फॅमिलीकडे डिसेंबर 2022 तिमाहीत टायटनचे 45895970 शेअर अथवा 5.17 टक्के हिस्सेदारी होती. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधान झाले आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारTataटाटाInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजारRakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवाला