tata group is plans to enter semiconductor manufacturing region to compete china
TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार! By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 3:50 PM1 / 15आताच्या घडीला TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुपच्या अनेक कंपन्या भन्नाट रिटन्सही देत आहेत. तसेच टाटा आता नवनव्या क्षेत्रातही पदार्पण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 15TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये टाटा ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 / 15यानंतर आता TATA ग्रुप नवीन क्षेत्रात उतरणार असून, चीनला थेट टक्कर देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली. 4 / 15भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टरची वाढती मागणी आणि कोरोना संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली चणचण या पार्श्वभूमीवर TATA ग्रुपने पाऊल उचलले असून, आता सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे. 5 / 15इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची जागतिक बाजारपेठ सुमारे १ ट्रिलियन डॉलर आहे. TATA ग्रुपने या मार्केटमध्ये हिस्सा मिळण्याच्या संधींचे आधीच नवीन व्यवसाय उभारले आहेत.6 / 15सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि भारतात कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर तयार करत नाही. यात कोरोना संकटाची भर आणि राजकीय कारणांमुळे कंपन्या आता इतर देशावर अवलंबून आहेत.7 / 15अशा स्थितीत भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे जगातील दुसरे सर्वांत मोठे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे, असे चंद्रशेखरन यांनी नमूद केले. सेमीकंडक्टर म्हणजे एक प्रकारच्या सिलिकॉन चिप्स आहेत. 8 / 15हे सेमीकंडक्टर गाड्या, कम्प्युटर आणि मोबाइलपासून अन्य अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरले जातात. हे सेमीकंडक्टर कंट्रोल आणि मेमरी फंक्शनशी संबंधित काम अधिक चांगल्या प्रकरे करते. अलीकडील काळात ऑटोमाबाइल उद्योगात सेमीकंडक्टर्सचा वापर जगभरात वाढला आहे. 9 / 15दरम्यान, Reliance Jio च्या प्रवेशानंतर टेलिकॉम क्षेत्र ढवळून निघाल्यासारखे झाले. स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. Airtel ने 5G चाचण्या सुरू केल्यानंतर अलीकडेच मुकेश अंबानी यांनी Jio 5G ची घोषणा केली.10 / 15भारतात ग्राहक ४जी नेटवर्क वापरत आहे. मात्र, अनेक कंपन्यांनी ५जी चे टेस्टिंग सुरू केल्याने लवकरच 5G सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आता TATA ग्रुपचा यामध्ये समावेश झाला आहे.11 / 15टाटा सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारानंतर आता TATA ग्रुपचा 5G मध्ये प्रवेश होणार आहे. टाटा सन्सचे यूनिट Panatone Finvest Ltd हे तेजस नेटवर्कमधील ४३.३५ टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे.12 / 15TATA सन्सची साहाय्यक कंपनी पॅनाटोन फिनवेस्टसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनी पॅनोटोनाल २५८ रुपये प्रति शेअर या दराने १.९४ कोटी इक्विटी शेअर देईल. याचे एकूण मुल्य ५०० कोटी रुपये असेल, अशी माहिती Tejas Network कडून देण्यात आली आहे.13 / 15पॅनाटोनकडून तेजस नेटवर्कच्या १३ लाख इक्विटी शेअर्सचे अधिग्रहण केले जाणार असून, काही वर्षांत हा करार पूर्ण झाल्यानंतर TATA सन्सची तेजस नेटवर्कमध्ये ७२ टक्के हिस्सेदारी असेल. याद्वारे टाटा सन्सच्या कंपनीकडे मोठी हिस्सेदारी येणार आहे.14 / 15दुसरीकडे, ठाण्यातील अर्जुन देशपांडे या तरुणाने Generic Aadhaar च्या स्टार्टअपची संकल्पना मांडली होती. ही संकल्पना उद्योगपती RATAN TATA यांना भावली. त्यामुळेच रतन टाटा यांनी Generic Aadhaar कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.15 / 15टाटा समूहाने 1MG कंपनीच्या शेअर्समधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. ई फार्मसी 1MG मध्ये बहुतेक शेअर्स हे सध्या टाटा डिजीटलकडे आहेत. 1MG सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करत असून, कंपनीच्या फ्रँचायजीसाठी रांगा लागत आहेत. टाटा ग्रुपने यासाठी ‘सेहत के साथी’ नावाचा प्रोग्राम लॉंच केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications