शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात भन्नाट रिटर्न! TATA च्या ‘या’ कंपनीचा ९ ₹चा शेअर १ हजारांवर; १ लाखाचे झाले १ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 6:05 PM

1 / 12
गेल्या अनेक दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चांगलेच चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, तरीही काही कंपन्यांनी दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले. यामुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. शेअर मार्केटमध्ये संयम महत्त्वाचा असल्याचा सल्ला दिला जातो.
2 / 12
TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या भारतीय बाजारपेठेसह शेअर मार्केटमध्येही आपल्या कामगिरीचा आलेख चढा ठेवताना दिसत आहेत. टाटावरील गुंतवणूकदारांचा विश्वास अनेकपटींनी वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच कंपन्यांचे प्रदर्शनही उत्तम होत आहे.
3 / 12
TATA ग्रुपमधील रिटेल क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या Trent कंपनीने कमाल कामगिरी केली असून, १०,७१३ टक्क्यांचा परतावा देत गुंतवणूकदारांना अतिशय मालामाल केले आहे. Trent ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाली, तेव्हा या कंपनीचा शेअर ९ रुपयांवर होता.
4 / 12
१ जानेवारी १९९९ रोजी Trent चा शेअर ९ रुपयांनी लिस्टिंग झाल्यानंतर हळूहळू या कंपनीने आपली यशस्वी घोडदौड काम ठेवली आणि ११ फेब्रुवारी २०२२ रोजी Trent कंपनीचा शेअर १ हजार ०६७ रुपयांवर पोहोचला आहे. ही कंपनी रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांच्या नेतृत्वात वाटचाल करत आहे.
5 / 12
१० वर्षांपूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१२ रोजी Trent कंपनीचा शेअर एनएसईवर ९४.०४ रुपयांवर होता, तोच आजच्या घडीला १,०६७.३० अंशांवर पोहोचला आहे. एकूणच प्रत्येक वर्षी या शेअरने १.२० टक्के वृद्धी साध्य केल्याचे सांगितले जाते.
6 / 12
एखाद्या गुंतवणूकदाराने २३ वर्षांपूर्वी Trent कंपनीत १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आज त्याचाच परतावा सुमारे १.०८ कोटी रुपयांपर्यंत मिळाला असता, असे सांगितले जात आहे. तसेच १० वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने Trent कंपनीत १ लाखाची गुंतवणूक केली असेल, तर त्याला आता ११.३४ लाखांचा परतावा मिळू शकला असता, असे सांगितले जात आहे.
7 / 12
दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 'खरेदी करा, होल्ड करा आणि विसरा' या धोरणाचा अवलंब करण्याशिवाय श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. म्हणून, एखाद्याने दीर्घकाळ स्टॉक ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण स्टॉकमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो.
8 / 12
TATA ग्रुपमधील टायटनचे (TATA Titan) शेअर्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या शेअर्सने २३ वर्षांत ५७,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. टाटा समुहाचा हा स्टॉक १ जानेवारी १९९९ रोजी ४.२७ रुपयांवर बंद झाला होता.
9 / 12
परंतु ८ फेब्रुवारी २०२२ रोजी या शेअरची किंमत २४३६.५५ रूपयांवर पोहोचली. याचाच अर्थ या शेअरने २३ वर्षांच्या कालावधीत ५७,०४१.६९ टक्क्यांचा परतावा दिला आहे. इतकंच नाही तर गेल्या १० वर्षांत या शेअरची किंमत २१०.१५ रूपयांवरून २४३६.५५ रूपयांवर आली आहे. यादरम्यान, या शेअरने गुंतवणूकदारांना १०५९.६ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिलंय.
10 / 12
१० फेब्रुवारी २०१७ मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वीही या शेअरची किंमत ४३२ रूपये होती. आजच्या या शेअरची तुलना करता कंपनीनं गुंतवणूकदारांना ४६४.८० टक्क्यांचे रिटर्न दिले आहे.
11 / 12
परंतु गेल्या एका वर्षाच्या कामगिरी पाहिले तर हा शेअर १५४१.७० रूपयांवरून २४३६.५५ रुपयांच्या स्तरावर पोहोचला आहे. या कालावधीत शेअरच्या किंमतीत ५८.२६ टक्क्यांची वाढ झालीये. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये टायटनच्या शेअर्समध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
12 / 12
टायटनच्या शेअर किमतीच्या पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने २३ वर्षांपूर्वी टाटा समूहाच्या या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याच्या १ लाखाचे आज ५.७० कोटी रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये १ लाख गुंतवले असते, तर त्याचे १ लाख आज ५.६४ लाख झाले असते.
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजार