शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Stock to buy : ‘टाटा’चा हा शेअर 1170 ₹ वर पोहोचण्याची शक्यता; खरेदी केल्यास होणार मोठा नफा, तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 1:12 PM

1 / 7
Stock to buy : तुम्ही टाटा समूहाच्या (Tata group) शेअर्स विकत घेण्याबाबत विचार करत असाल, तर तुम्ही टाटा केमिकल लिमिटेडच्या (TATA chemical limited) शेअर्सवर नजर ठेवू शकता. आगामी काळात टाटा केमिकल्सचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करू शकतात.
2 / 7
रोकरेज कंपन्या कंपनीच्या शेअर्सवर बुलिश आहेत आणि ते खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. आनंद राठी यांनी याची टार्गेट प्राईज 1,170 रुपये प्रति शेअर ठेवली आहे. सध्या कंपनीचा शेअर 934.10 रुपयांवर आहे. म्हणजेच, आता तुम्ही यात गुंतवणूक केल्यास 25.25 टक्के नफा कमवू शकता.
3 / 7
आनंद राठी यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला खात्री आहे की कंपनी पुढील दोन वर्षांत 13 टक्क्यांच्या सीएजीआर दराने महसूल वाढवेल. तसेच, आम्हाला विश्वास आहे की कंपनी खर्च कमी करेल, प्लांट प्रोडक्शन वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय कर्ज कमी करेल. तसंच त्यांचे प्रॉफिट मार्जिन राखण्यावर लक्ष केंद्रित करेल.
4 / 7
आपल्या आर्थिक वर्ष 2022 उत्पन्नाच्या 19.6x आणि FY23E च्या उत्पन्नाच्या 17.4x वर व्यवसाय करत आहे. आम्ही टाटा केमिकलवर बाय रेटिंग आणि 1170 प्रति शेअरच्या टार्गेट प्राईसवर आपलं कव्हरेज सुरू करतो, असंही त्यांनी सांगितलं.
5 / 7
टाटा केमिकलच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये 1.08 टक्क्यांची घसरण झाली आहे. परंतु गेल्या महिन्यामध्ये यात 3.25 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या सहा महिन्यांमध्ये यात 7.38 टक्क्यांची वाढ झाली आणि वर्ष 2022 मध्ये (YTD) 5.76 टक्क्यांची वाढ झाली आहे.
6 / 7
टाटा केमिकल्स लिमिटेड एक मिड कॅप रासायनिक उद्योग कंपनी आहे आणि त्याचं मार्केट कॅप 24,660 कोटी रुपये इतकं आहे. ही कंपनी आशियातील सर्वात मोठी सॉल्टवर्क्स तसेच जगातील तिसरी सर्वात मोठी सोडा अॅश आणि सहाव्या क्रमांकाची सोडियम बायकार्बोनेट उत्पादक आहे.
7 / 7
टाटा केमिकल्सचे बेसिक केमिस्ट्री आणि स्पेशलिटी केमिस्ट्री असे दोन विभाग आहेत. काच, डिटर्जेंट, औषध, बिस्किट बनवणे, बेकरी आणि इतर क्षेत्रांसाठी जगातिल काही प्रमुख ब्रांड कंपनीच्या बेसिक केमिस्ट्री प्रोडक्ट लाइनवर अवलंबून आहेत. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक