TATA ची बेमिसाल कामगिरी! ‘या’ कंपनीने दिले वर्षभरात २०० टक्के रिटर्न; गुंतणूकदारांची दिवाळी By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 3:43 PM
1 / 10 TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात कार्यरत असून, शेअर बाजारात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटचीही विक्रमी घोडदौड सुरू असून, याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होत आहे. 2 / 10 TATA ग्रुपमधील एका कंपनीची शेअर मार्केटमधील दमदार कामगिरी कायम असून, या कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात तब्बल २०० टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या आठवडाभर या कंपनीचा बोलबाला शेअर मार्केटमध्ये दिसून आला. या कंपनीचे नाव टाटा मोटर्स आहे. 3 / 10 Tata Motors चे गेल्या आठवड्यापासून शेअर्स वधारत असून, ही कामगिरी कायम राखण्यात कंपनीला यश आले आहे. यासह Tata Motors चा मार्केट कॅप १.४९ लाख कोटी रुपये झाला आहे. सोमवारी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. 4 / 10 गेल्या वर्षभरात Tata Motors ने गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांचा परतावा दिल्याचे सांगितले जात असून, केवळ ऑक्टोबर महिन्यात या कंपनीने २५ टक्के रिटर्न्स दिल्याचे सांगितले जात आहे. 5 / 10 कोरोना संकटाच्या काळातही Tata Motors च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले नाही. गेल्या वर्षी याच कालावधीत Tata Motors चा शेअर १३५ रुपये होता, तोच शेअर आजच्या घडीला ४१७ रुपयांवर गेला आहे. 6 / 10 Tata Motors ने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कायम ठेवलेला दबदबा तसेच सप्टेंबर महिन्यात एकूण कार विक्रीत केलेली विक्रमी कामगिरी यांमुळेच Tata वरचा गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्यात विक्रीत Tata Motors च्या दोन कार टॉप-१० मध्ये राहिल्या. 7 / 10 यात Tata Motors बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत मायक्रो एसयुव्ही टाटा पंच भारतीय बाजारात सादर करत आहे. या गाडीचे इलेक्ट्रिक व्हर्जनही पाहायला मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे संकेत कंपनीकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 8 / 10 दरम्यान, कोरोना संकटकाळातही Tata Motors ने घसघशीत बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सलग तिसऱ्या वर्षी कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर केला आहे. 9 / 10 कोरोना संकटकाळातही Tata मोटर्सने कामगारांना यंदा दिवाळीसाठी किमान ३८ हजार २०० रुपये ते कमाल ५० हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार रुपयांनी बोनस जास्त आहे. या निर्णयाचा फायदा सहा हजार कामगारांना होणार आहे. 10 / 10 TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आणखी वाचा