tata group tata teleservices maharashtra limited ttml makes 1 lakh into 23 lakh since january 2021
TATA च्या महाराष्ट्रातील कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! वर्षभरात झाले १ लाखाचे २३ लाख; पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 3:25 PM1 / 15सन २०२१ शेअर मार्केटच्या दृष्टीकोनातून खूपच चढ-उताराचे राहिले. एकीकडे शेअर मार्केटने विक्रमी उच्चांक स्तर गाठला. तर शेकडो अंकांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसानही झाले. 2 / 15दुसरे म्हणजे शेअर मार्केटमध्ये सादर करण्यात आलेल्या IPO नेही सन २०२१ दणाणून सोडले. अनेकविध क्षेत्रातील कंपन्यांनी शेअर बाजारातून कोट्यवधी रुपयांचा निधी उभारला. 3 / 15गेल्या अनेक दिवसांपासून TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. टाटा ग्रुपमधील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत असून, गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत.4 / 15टाटाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यातच आता TATA ग्रुपच्या आणखी एका कंपनीची भर पडली आहे. तज्ज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना हजारो टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.5 / 15जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत TATA च्या कंपनीने २३०० टक्क्यांपर्यंतचा छप्परफाड परतावा दिल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या सलग काही दिवसांपासून या कंपनीचा शेअर तेजीत असून, अप्पर सक्रिट लागत आहे. 6 / 15TATA ग्रुपमधील ही कंपनी म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (TTML) आहे. TTML च्या या कंपनीचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सतत तेजीत असून, शेअर मार्केटमधील चढ-उताराचा या कंपनीच्या शेअर्सवर काही परिणाम झालेला नाही. उलट गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे. 7 / 15TTML कंपनीच्या शेअर्समध्ये १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत २२.८४ टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी २०२१ मध्ये या कंपनीचा शेअर ७.८५ रुपये होता, तोच शेअर आता १८७ रुपयांच्याही वर गेला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने जानेवारी २०२१ मध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आता २३ लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. 8 / 15तज्ज्ञांच्या मते, TTML कंपनीतील तेजी आणखी काही दिवस अशीच कायम राहू शकते. तसेच या स्तरावरील शेअर्समुळे नफावसुलीही पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे. TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेसची सब्सिडियरी कंपनी आहे.9 / 15TTML आपल्या सेगमेंटमधील आघाडीवर असणारी कंपनी आहे. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेकविध बड्या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात या कंपनीने स्मार्ट इंटरनेट बेस सर्व्हिस कंपनी सुरू केली असून, याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.10 / 15याशिवाय या कंपनीने सुरू केलेल्या स्मार्ट इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये फास्ट इंटरनेट तसेच क्लाउड बेस्ड सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोल देण्यात येत आहे. हीच सुविधा ग्राहकांना प्रचंड आवडली असल्याचे म्हटले जात आहे.11 / 15तसेच TTML कंपनीचे कमाई दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचा तोटा १४१० कोटींनी घसरून ६३२ कोटींवर आला आहे. या कंपनीत प्रमोटर्सचा हिस्सा सर्वाधिक असून, कंपनीसाठी ही बाब चांगली आहे, असे म्हटले जात आहे.12 / 15TTML मध्ये Tata Sons चा ७४.३ टक्के हिस्सा आहे. तर रिटेल गुंतवणूकदारांचा या कंपनीतील हिस्सा २६.६ टक्के आहे. टाटा सन्स या कंपनीसंदर्भात मोठी योजना आखत असून, भविष्यात या कंपनीला Tata Tele Business Services (TTBS) नावाने लॉंच केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.13 / 15दरम्यान, शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत. TATA ग्रुपमधील टीसीएसनंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे.14 / 15शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजेच बाजारमूल्य आठवडाभरात १,२९,०४७.६१ कोटी रुपयांनी वाढले. यामधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) याच काळात सर्वांत जास्त फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. का अहवालानुसार, TCS चे मार्केट कॅप ७१,७६१.५९ कोटी रुपयांनी वाढले आहे.15 / 15TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. TATA ग्रुप जगातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात TATA ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications