शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मार्केट डाऊन, पण TATA चा शेअर तेजीत! १० हजाराचे झाले १ कोटी; ‘या’ कंपनीची कमाल कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 4:46 PM

1 / 9
आताच्या घडीला रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम शेअर मार्केटवर होताना पाहायला मिळत आहे. अनेकविध कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अशातच TATA ग्रुपच्या एका कंपनीने कमाल कामगिरी करत तेजी कायम राखली आहे.
2 / 9
TATA ग्रुप या कंपनीची गेल्या काही महिन्यातील कामगिरी आश्वासक आहे. शेअर मार्केटमधील बिग बूल राकेश झुनझुनवाला यांचाही हा फेव्हरिट स्टॉक असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवड्याभराच्या कालावधीत या शेअरने रॉकेट स्पीड पकडला आहे.
3 / 9
TATA ग्रुपमधील या कंपनीचे नाव आहे Titan. टायटन कंपनीचा शेअर एनएसईवर आपल्या ऑल टाईम हाय लेव्हल म्हणजेच २,६८७.२५ रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. दरम्यान, काही तज्ज्ञ हा शेअर खरेदी करण्याचा अथवा होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत.
4 / 9
TATA चा एक संयुक्त उपक्रम असून, एखाद्या गुंतवणूकदारांना २० वर्षांपूर्वी या कंपनीत केवळ १० हजार रुपये गुंतवले असते, तर आता त्याला १ कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळाला असता. एखाद्या गुंतवणूकदाराने याच कालावधीत १ लाख रुपये गुंतवले असते, तर याचीच किंमत आता ११ कोटींच्या घरात पोहोचली असती, असे सांगितले जात आहे.
5 / 9
टाटा Titan ने गेल्या २० वर्षांच्या कालावधीत तब्बल १ हजार टक्क्यांचा परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे, असे सांगितले जात आहे. टायटन कंपनीचा मार्केट कॅप आताच्या घडीला सव्वा दोन लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. टायटन कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली, तेव्हा त्याच्या शेअरची किंमत २.३५ रुपये होती.
6 / 9
Titan कंपनीचा शेअर १० वर्षांपूर्वी १७८ रुपयांवर होता. आता तोच शेअर २,६८७ रुपयांवर गेला आहे. टायटन कंपनीने दागिने, सन-ग्लासेस आणि घड्याळ्यांच्या सेगमेंटमध्ये स्थिर वाढ दर्शविली आहे. कंपनीने परफ्यूम व्यवसायात उल्लेखनीय एन्ट्री केली आहे. कंपनीनं नवी स्मार्ट वॉचेस लाँच केली असून ती लोकांच्याही पसंतीस उतरत आहेत.
7 / 9
दरम्यान, Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे टायटन कंपनीचे ४५,२५०,९७० शेअर्स आहेत. याशिवाय त्यांच्या पत्नीचीही मोठी गुंतवणूक टाटाच्या टायटनमध्ये आहे. TATA ग्रुपमधील एका या कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांना २५,७३३ टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा केल्याचे सांगितले जाते.
8 / 9
TATA ग्रुपमधील वातानुकूलित उत्पादने तयार करणाऱ्या Voltas या कंपनीची शेअर मार्केटमध्ये दमदार कामगिरी सुरू आहे. व्होल्टाज कंपनीचा शेअर ४ रुपयांवरून थेट १२०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. २२ वर्षांपूर्वी या कंपनीचा शेअर एनएसईवर ४ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.
9 / 9
गेल्या ५ वर्षांत Voltas कंपनीचा स्टॉक ३४६ रुपयांवरून १,२०९ रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना २४९.४२ टक्के परतावा दिला आहे. गेल्या २२ वर्षांत Voltas कंपनीने गुंतवणूकदारांना सुमारे २५,७३३ टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे.
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजार