tata group to take big decision now vistara could merge with air india likely in the end of 2023
Vistara Air India Merger: मेगा मर्जर! विस्ताराचे एअर इंडियामध्ये लवकरच विलीनीकरण होणार? टाटा मोठा निर्णय घेणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:21 AM1 / 9TATA समूहामध्ये Air India ची घरवापसी झाल्यानंतर आता एअर इंडियामध्ये मोठे बदल करण्यास टाटा समूह इच्छूक आहे. एअर इंडियाला जागतिक स्तरावरील मोठी एअरलाइन्स करण्याच्या दृष्टिने टाटा पावले टाकताना दिसत आहे.2 / 9TATA ने अलीकडेच एअर इंडियाच्या सीईओपदी विल्सन कॅम्बेल यांची नियुक्ती केली आहे. कॅम्बेल यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव टाटासाठी अतियश उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. 3 / 9यातच आता एअर इंडियामध्ये विस्ताराचे विलिनीकरण होणार असल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडिया घेतल्यानंतर टाटा समूहाच्या पोर्टफोलिओमध्ये आता तीन एअरलाइन्स आहेत. सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा संयुक्त उपक्रमाद्वारे विस्तारा ऑपरेशन्सवर देखरेख करते. (Vistara Air India Merger)4 / 9तसेच, टाटा समूह, एअर एशियासह संयुक्त उपक्रमात एअर एशिया इंडियाद्वारे विमानसेवा देखील प्रदान करत आहे. एअर इंडियाची सूत्र टाटाकडे येताच विस्तारा आणि एअर इंडियाचे विलीनीकरण होईल अशी चर्चा रंगली आहे. 5 / 9सिंगापूर एअरलाइन्सने पुढे जायचे की, नाही यासाठी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वेळ मागितल्याचे बोललं जात आहे. टाटा सन्सने सिंगापूर एअरलाइन्ससोबत विस्तारामधील संभाव्य विलीनीकरण करण्यासाठी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.6 / 9टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सने या वर्षाच्या सुरुवातीला विलीनीकरणाच्या शक्यतेवर चर्चा केली आहे. सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडियासाठी टाटा बोलीमध्ये सामील होण्यासही सहमती दर्शविली होती. परंतु साथीच्या आजारामुळे, तिची खराब आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिले आहे. 7 / 9टाटा समूहाला बोली लावण्याची परवानगी देण्यासाठी सिंगापूर एअरलाइन्सने विस्ताराच्या करारातील गैर-स्पर्धी कलम काढून टाकले होते. एअर इंडिया आता पूर्णपणे टाटा समूहाच्या मालकीची आहे, तर विस्तारा हा टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्समधील ५१:४९ चा संयुक्त उपक्रम आहे.8 / 9विस्तारा एअरलाइन्स ही टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. या दोन कंपन्यांनी मिळून ९ जानेवारी २०१५ रोजी या कंपनीचे कामकाज सुरू केले. टाटा Neu अॅप यावर्षी ७ एप्रिल रोजी लाँच करण्यात आले आहे. या अॅपवर ग्राहकाला प्रत्येक खरेदीसाठी नवीन लॉयल्टी पॉइंट मिळतो. 9 / 9या अॅपवर ग्राहकाला प्रत्येक खरेदीसाठी नवीन लॉयल्टी पॉइंट मिळतो. त्याचप्रमाणे विस्ताराचा क्लब विस्तारा नावाचा फ्रिक्वेंटफ्लायर प्रोग्राम आहे आणि तो प्रत्येक खरेदीसाठी प्रवाशांना CV पॉइंट्स देतो. टाटा समूहाची एअरएशिया एअरलाइन या अॅपवर आधीच नोंदणीकृत आहे. टाटा समूहाच्या विस्तारा, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस अद्याप टाटा नियू अॅपमध्ये सामील झालेल्या नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications