शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹4100 वर जाऊ शकतो टाटाचा हा शेअर, गुंतवणूकदारांना करतोय मालामाल; कंपनीचा प्रॉफिट 138% नं वाढला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 9:37 PM

1 / 7
जर आपण टाटा ग्रुपच्या एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरू शकते. आपण टाटा समूहाच्या ट्रेंट लिमिटेडच्या (Trent Limited) शेअर्सवर फोकस करू शकता. या शेअरसंदर्भात ब्रोकरेज बुलिश दिसत आहेत.
2 / 7
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी 3830 रुपयांच्या स्टॉप लॉससह 4100 रुपयांच्या टार्गेट प्राइससह लार्ज कॅप स्टॉक ट्रेंट खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, सध्या ट्रेंटच्या शेअरची किंमत 4035 रुपये एवढी आहे आणि हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
3 / 7
काय म्हणताय ब्रोकरेज? - मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे डेरिव्हेटिव्ह आणि अॅनालिस्ट चंदन तापडिया यांनी लार्ज कॅप स्टॉक ट्रेंटला 4100 रुपयांच्या टार्गेट प्राइससह खऱेदी करण्याचा सल्ला दिला आहे आणि 3,830 रुपयांचे स्टॉप लॉस ठेवले आहे.
4 / 7
बीएसईवर ट्रेंट शेअर्सचा 52- आठवड्यांचा उच्चांक 4035.00 रुपये तर निचांक1272.40 रुपये एवढा आहे. ट्रेंटच्या शेअरने गेल्या 6 महिन्यांत 105% चा परतावा दिला आहे. तर गेल्या एका वर्षात 195% चा परतावा दिला आहे.
5 / 7
कंपनीला झाला छप्परफाड नफा - टाटा समूहाची रिटेल कंपनी असलेल्या ट्रेंटने नुकतेच डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली. ट्रेंडचा निव्वळ नफा 138 टक्क्यांनी वाढून 370.6 कोटी रुपये राहिला आहे.
6 / 7
कंपनीचा रेव्हेन्यू 50 टक्क्यांनी वाढून 3466 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ट्रेंटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई (ईबीआयटीडीए) 95% वाढून 629 कोटी रुपये झाली आहे. मार्जिन 18% घोषित करण्यात आले आहे. जो एक वर्ष पूर्वीच्या कालावधीत हा 14% होता.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकTataटाटा