Tata Motors' big performance; 3203 crore net profit earned in just 3 months
Tata Motors ची धमाकेदार कामगिरी; अवघ्या 3 महिन्यांत कमावला 3203 कोटींचा नफा By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 7:37 PM1 / 8 टाटा मोटर्सने आपल्या वाहनांचा नवीन पोर्टफोलिओ लॉन्च केल्यापासून आणि इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आघाडी घेतल्यापासून कंपनीचे नशीब पालटले आहे. आता कंपनीने केवळ 3 महिन्यांत 3203 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. टाटा मोटर्सने नेमकं काय केलं, ज्यामुळे कंपनीची झपाट्याने वाढ झाली?2 / 8 कंपनीने हा नफा 2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून कालावधीत कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 5,007 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. इतकंच नाही तर यावेळी कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू 42 टक्क्यांनी वाढून 1 लाख कोटींच्या घरात गेला आहे. हा आता 1,02,236.08 कोटी रुपये झाला आहे.3 / 8 टाटा मोटर्सचे नशीब बदलण्यात त्यांच्या आलिशान कार्सनी मोठी भूमिका बजावली आहे. टाटा समुहाच्या जॅग्वार लँड रोव्हर (JLR) चा महसूल 57 टक्क्यांनी वाढून 6.9 अब्ज पौंड झाला आहे, तर ऑपरेटिंग मार्जिन 16.3 टक्के वाढला आहे.4 / 8 जेएलआरची ऑर्डर बुक मजबूत आहे. कंपनीला 1,85,000 रेंज रोव्हर, रेंज रोव्हर स्पोर्ट आणि डिफेंडरच्या ऑर्डर मिळाल्या. हे त्यांच्या एकूण ऑर्डर बुकच्या 76 टक्के आहे.5 / 8 या कालावधीत कंपनीचा फ्री कॅशफ्लो 45.1 कोटी पौंड राहिला, जो जेएलआरच्या इतिहासातील सर्वोच्च आहे. गेल्या 3 तिमाहीत कंपनीचा कॅशफ्लो 1.8 अब्ज पौंड राहिला आहे. अशाप्रकारे, कंपनीच्या हातात रोख रक्कम 4 अब्ज पौंड झाली आहे, तर कर्ज कमी झाले आहे, जे जून अखेरीस 2.5 अब्ज पौंडांवर आले आहे. 1 पौंडची किंमत 105 भारतीय रुपयांच्या बरोबरीची आहे.6 / 8 टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हीकल बिझनेसमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. या बिझनेसचा रेव्हेन्यू 4.4 टक्क्यांनी वाढून 17000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर, ऑपरेटिंग मार्जिन 9.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.7 / 8 टाटा नेक्सॉन आणि टाटा पंच सारखी लोकप्रिय वाहने बनवणाऱ्या टाटा मोटर्सच्या पॅसेंडर व्हीकल बिझनेसचा रेव्हेन्यू 11 टक्क्यांनी वाढला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत देशांतर्गत बाजारात होलसेल विक्रीत 7.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर किरकोळ विक्रीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीने 19,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे.8 / 8 स्टॉक मार्केटमध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्सने जबरदस्त वाढ नोंदवली. एप्रिलच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर 424.25 रुपयांवर होता, जो 30 जून 2023 ला 595.55 रुपयांवर आला. अशाप्रकारचे कंपनीच्या शेअर होल्डर्सना 40 टक्के फायदा झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications