tata motors registers 53 percent growth in august 2021 car sales and ev sales completed 1000 units
TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 6:45 PM1 / 13कोरोनाचा देशात शिरकाव होण्याच्या काही महिने आधीपासून ऑटोमोबाइल क्षेत्रात मंदी असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, कोरोना संकटानंतर सर्वच क्षेत्रातील कारभार ठप्प झाला. 2 / 13अनेकविध क्षेत्रे आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून हळूहळू सावरताना पाहायला मिळत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातही प्रगती होताना दिसत असून, अनेक कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या तुलनेत चांगली विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. 3 / 13देशातील मोठी कार निर्माता असलेल्या TATA मोटर्सने विक्रीमध्ये चांगली वाढ नोंदवली आहे. टाटा मोटर्सची एकूण विक्री ऑगस्टमध्ये वाढून ५७,९९५ युनिट्स झाली जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३६,५०५ युनिट्स होती. 4 / 13उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत अंडर रिव्ह्यू महिन्यात कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री ५३ टक्क्यांनी वाढून ५४,१९० युनिट्स झाली आहे. कंपनीच्या एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री ऑगस्टमध्ये वाढून २९,७८१ युनिट झाली.5 / 13गेल्या वर्षी याच महिन्यात १७,८८९ युनिट्स इतकी होती. M & HCV ट्रक, बस आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायासह एकूण MHCV विक्री ऑगस्ट २०२१ मध्ये ७,६४६ युनिट्स इतकी नोंदवण्यात आली आहे. जी ऑगस्ट २०२० मध्ये ३,३०५ युनिट्स इतकी होती.6 / 13ऑगस्ट २०२० मध्ये एकूण कार विक्री १८,५८३ युनिट्सच्या तुलनेत वाढून २८,०१८ युनिट्स झाली. कंपनीने सांगितले आहे की, या महिन्यात त्यांच्या ईव्ही विक्रीने महत्त्वपूर्ण एक हजार युनिट्सचा टप्पा पार केला आहे.7 / 13ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडियाची एकूण विक्री ऑगस्टमध्ये १,३०,६९९ इतकी नोंदवण्यात आली आहे जी २०२० च्या याच महिन्यात १,२४,६२४ युनिट्स इतकी होती. ऑगस्ट महिन्यात एकूण विक्रीमध्ये १,०५,७७५ युनिट्सची घरगुती विक्री ४,३०५ युनिट्सच्या इतर ऑरिजनल इक्विपमेंट मॅनुफॅक्चरर ऑफ-टेक आणि २०,६१९ युनिट्सची निर्यात यांचा समावेश आहे. 8 / 13दरम्यान, TATA ग्रुपमधील टाटा मोटर्स कंपनीने टेस्लाच्या एलन मस्क यांनी केलेल्या एका मागणीला जोरदार विरोध दर्शवला असून, मोदी सरकारच्या योजनेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. 9 / 13Tesla चे सीईओ एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वांत जास्त आयात शुल्क आकारले जाते असे म्हटले होते. तसेच आम्हाला आयात शुल्कामध्ये किमान तात्पुरती सवलत तरी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.10 / 13एलन मस्क यांनी केलेल्या याच मागणीला TATA मोटर्सने विरोध दर्शवला आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर युनिटचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे की, एलन मस्क यांची मागणी केंद्र सरकारच्या FAME म्हणजेच फास्टर एडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाइब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसीच्या विपरीत आहे. 11 / 13या पॉलिसीच्या माध्यमातून भारताला इलेक्ट्रिक वाहन उत्पादनचे केंद्र बनवण्याचे केंद्रातील मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आयात शुल्क कमी करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यावर भर द्यायला हवा.12 / 13एलन मस्क यांच्या मागणीमुळे केंद्र सरकारच्या फेम प्रोग्रामचा उद्देश पूर्ण होणार नाही, असेही चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. आताच्या घडीला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात TATA मोटर्सचा वाटा ९० टक्के आहे. 13 / 13TATA मोटर्सची Nexon EV प्रचंड लोकप्रिय ठरली असून, ती सर्वाधिक खपाची इलेक्ट्रिक कार ठरली आहे. तसेच अधिकाधिक कार इलेक्ट्रिक करण्याची तयारी टाटा मोटर्सने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून TATA Tigor EV लॉन्च केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications