TaTa Power share made investors wealthy; stock gets 'double' during the year
TaTa ने केले गुंतवणूकदारांना मालामाल; या शेअरने वर्षभरात पैसे केले 'डबल' By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 2:17 PM1 / 8टाटा समुहाच्या (Tata Group) कंपन्यांनी मोठी झेप घेतली आहे. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस नंतर आणखी एका कंपनीने टाटाच्या गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडले आहे. (Tata Power Shares Doubles money of investors in one year.)2 / 8टाटाच्या शेअरने वर्षभरात लोकांचा पैसा डबल केला आहे. हा शेअर Tata Power चा आहे. वीज निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या टाटांच्या या कंपनीने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. कंपनीचा शेअर वर्षभरापूर्वी 57 रुपये होता, तो आता 133 रुपयांपेक्षा वर गेला आहे. 3 / 8टाटा पावरच्या समभागांचे मुल्य वाढल्याने कंपनीचे बाजारमुल्य देखील 42000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. आता विचार करायचा आहे की, एवढा वाढला असताना शेअर खरेदी करणे योग्य आहे की नाही. 4 / 8टाटा पॉवर ही नफ्यातील कंपनी आहे. कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात जास्त त्या कंपनीचे आर्थिक प्रदर्शन पाहिले जाते. यामध्ये टाटा पॉवरला पाहिले तर जून 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफा 465.69 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी कंपनीने या तिमाहीत 268.10 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 5 / 8Tata Power चे उत्पन्नही वाढले आहे. एप्रिल-जून 2021 मधील कंपनीची एकूण कमाई 55 टक्के वाढून 10,145.89 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात कंपनीचे उत्पन्न 6,540.42 कोटी रुपये होते. 6 / 8MarketsMojo नुसार Tata Power गेल्या पाच तिमाहींमध्ये फायद्यात आहे. कंपनीवर कर्जाचा बोजादेखील मोठा आहे. Motilal Oswal नुसार कंपनीचे प्रमोटरकडून यामध्ये पैसा टाकला गेला तर हे कर्जाचे ओझे कमी होईल. भविष्यात कंपनीकडे चांगले प्रकल्प आहेत. 7 / 8शेरखानने (Sharekhan) टाटा पावरच्या शेअरना 'Buy' रेटिंग दिली आहे. शेरखानच्या म्हणण्यानुसार कंपनी बिझनेस रिस्ट्रक्चरिंगवर लक्ष देत आहे. यामुळे कंपनीची बॅलन्सशीट सुधारण्याची शक्यता आहे.8 / 8Tata Power च्या फ्यूचर प्लॅनबाबत कंपनीचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा यांचे म्हणणे आहे की, ते रिन्युएबल एनर्जी पोर्टफोलियोच्या स्तराला वाढवणार आहोत. कंपनी 4 गीगावॅटवरून 2025 पर्यंत 15 गीगावॅट आणि 2030 पर्यंत 25 गीगावॅटपर्यंत नेण्यात येणार आहे. यामुळे रिन्यूएबल एनर्जी मधील वाटा 31 टक्क्यांनी वाढून 80 टक्क्यांवर जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications