TATA आता Air India साठी १८ हजार कोटींचे कर्ज घेणार! अनेक विमाने खराब; अधिग्रहण कठीण? By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 2:45 PM
1 / 10 अनेक महिन्यांनंतर अखेर Air India ची मालकी TATA समूहाकडे जाणार, यावर शिक्कमोर्तब झाले आहे. मात्र, Air India सारख्या आधीच हजारो कोटींचे कर्ज असलेल्या कंपनीचे संचालन TATA समूहाला सुलभ असणार नाही असे सांगितले जात आहे. 2 / 10 तब्बल ६८ वर्षांनी Air India ची TATA मध्ये घरवापसी होणार आहे. TATA समूहातील टाटा सन्सकडे एअर इंडियाचा कार्यभार एप्रिल २०२२ पर्यंत मिळेल, असे सांगितले जात आहे. एअर इंडियाची एकूण १४१ विमाने टाटाला मिळणार आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ११८ विमाने उत्तमरित्या कार्यरत आहेत. तर २३ विमाने खराब आहेत. 3 / 10 TATA सन्सला या सर्व २३ विमानांची दुरुस्ती करावी लागणार आहे. एअर इंडियाच्या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सगळा खर्च टाटा सन्सला करावा लागणार आहे. कारण सरकार आता याचा खर्च करणार नसल्याचे सांगितले जात आहे. 4 / 10 TATA ग्रुप प्रचंड मोठा असून, टाटा सन्सला यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, तराही टाटा समूह Air India अधिग्रहणासाठी तब्बल १८ हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. टाटा समूह एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी सिंडिकेटेड कर्जाद्वारे १५ हजार कोटी रुपयांपर्यंत निधी उभारू शकतो. 5 / 10 कर्जासाठी मॅच्युरिटी तीन वर्षे असेल आणि व्याज दर ७ टक्के असेल. या प्रस्तावित व्यवहारामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रमुख बँक असू शकते. कारण त्यांनी बोली लावण्यासाठी आवश्यक बँक हमी आधीच दिली होती. 6 / 10 TATA समूह काही परदेशी बँका आणि निवडक स्थानिक बँकांशीही चर्चा करत आहे. परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी, ड्यूश, जेपी मॉर्गन आणि बार्कलेज यांचा समावेश आहे. प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तीने ही माहिती ईकॉनॉमिक टाइम्सला दिली आहे. 7 / 10 ऑटोमोबाईल ते एव्हिएशन क्षेत्रात काम करणाऱ्या या ग्रुपला विमान कंपनीसाठीच्या बोलीचा विजेता घोषित करण्यात आले. दोनवेळा प्रयत्न केल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला चार वर्षे लागली. TATA सन्सला लवकरच लेटर ऑफ इंटेंट मिळणे अपेक्षित असून, प्रस्तावित कर्जावर अद्याप चर्चा सुरू आहे. 8 / 10 TATA सन्स Air India च्या अधिग्रहणापूर्वी थोड्या कालावधीसाठी सल्लागारांची तुकडी तयार करत आहे. यात टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ज्यात बोर्ड सदस्य, जागतिक उड्डाण तज्ज्ञ आणि एअर इंडियाचे काही उच्च अधिकारी असतील. एअर इंडियाचा समावेश असलेल्या गटासाठी निधी योजनांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 9 / 10 कोणत्याही अधिग्रहणासाठी निधी देण्याबाबत स्थानिक बँकांना काही मर्यादा आहेत. पण, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सूट आहे. SBI आणि TATA यांच्यातील संबंध दीर्घकाळ टिकू शकतात. तर काही परदेशी बँकांनी टाटा सन्सला टर्म शीट पाठवली आहे, असे सांगितले जात आहे. 10 / 10 Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा TATA सन्सला मिळणार आहे. मात्र, आता टाटाला मोठी रणनीती आखायला लागणार असून, याचे संचालन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा