शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Air India नंतर आणखी एक मोठ्या तोट्यातील सरकारी कंपनीचा ताबा टाटांकडे; मिळाली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 7:45 PM

1 / 7
एअर इंडियानंतर (Air India) आता टाटा समूहाकडे आणखी एक सरकारी कंपनी येणार आहे. सरकारने सोमवारी निलाचल इस्पात निगम लिमिटेडला (NINL) टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्सना विक्री करण्यास मान्यता दिली.
2 / 7
आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने ९३.७१ टक्के शेअर्ससाठी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्सच्या सर्वोच्च बोलीला मंजुरी दिली आहे. हा करार सुमारे १२,१०० कोटी रुपयांचा असेल. NINL हा चार सीपीएसई आणि ओडिशा सरकारच्या दोन राज्य सार्वजनिक उपक्रमांचा जॉईन्ट व्हेन्चर आहे.
3 / 7
कंपनीमध्ये सरकारची कोणतीही इक्विटी नाही. सार्वजनिक उपक्रमांच्या बोर्डाच्या विनंतीवर आणि ओडिशा सरकारच्या संमतीच्या आधारावर, सीसीईएनं ८ जानेवारी २०२० रोजी NINL च्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीला 'तत्त्वतः' मान्यता दिली होती आणि व्यवहारासाठी निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापनाला अधिकार देण्यात आले होते, असं निवेदनाद्वारे सांगण्यात आलं.
4 / 7
NINL हा चार CPSEs - MMTC, NMDC, BHEL, MECON आणि ओडिशा सरकारच्या दोन PSU - OMC आणि IPICOL यांचा संयुक्त उपक्रम आहे. NINL चा कलिंगनगर, ओडिशा येथे १.१ मेट्रिक टन क्षमतेचा एकात्मिक स्टील प्लांट आहे. कंपनी मोठ्या नुकसानीत असून ३० मार्च २०२० पासून प्लांट बंद आहे.
5 / 7
कंपनीकडे गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत ६,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जे आणि दायित्वे आहेत. यामध्ये प्रवर्तक (४,११६ कोटी), बँका (१,७४१ कोटी), इतर कर्जदार आणि कर्मचाऱ्यांची मोठी देणी समाविष्ट आहे.
6 / 7
३१ मार्च २०२१ पर्यंत कंपनीची मालमत्ता निगेटिव्ह ३४८७ कोटी रुपये होती आणि ४,२२८ कोटींचे कंपनीला नुकसान झाल्याचं म्हटलं होतं. हा व्यवहार खुल्या बाजारातून, कंपनीच्या एंटरप्राइझ मूल्यासाठी स्पर्धात्मक बोली प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आला.
7 / 7
३१ मार्च २०२१ रोजी कंपनीची दायित्वे आणि ६ विकल्या गेलेल्या PSE भागधारकांद्वारे कंपनीच्या ९३.७१ टक्के इक्विटीचा समावेश असल्याचं निवेदनात म्हटलंय.
टॅग्स :TataटाटाGovernmentसरकारbusinessव्यवसाय