शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनच्या बॉर्डरवर TATA ची एन्ट्री; ड्रॅगनला कोंडीत पकडण्याचा भारताचा प्लॅन काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:35 PM

1 / 10
इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि त्यांच्या साहित्याचे मॅन्युफॅक्चरिंग यात भारताला आत्मनिर्भर व्हायचं आहे. त्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपकडून पुढाकार घेण्याची शक्यता आहे. सध्या भारत उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे.
2 / 10
परंतु आजही इलेक्ट्रॉनिक उत्पादने जसे मोबाईल आणि त्याला लागणारे पार्ट्स हे चीन आणि अन्य देशातून आयात करावे लागतात.मात्र आता भारत स्मार्टफोनच्या बॅटरीसह चिपसेट देशातंर्गतच बनवण्यावर भर देत आहे. ही उत्पादने भारतातच बनवण्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे
3 / 10
या योजनेतंर्गत टाटा यांच्याकडून चीनच्या बॉर्डरवरील राज्य आसाममध्ये चिप प्रोसेसिंग प्लॅट उभारला जाणार आहे. यासाठी टाटाकडून प्रस्ताव दिला जाणार असून या प्रकल्पासाठी टाटा कंपनी जवळपास ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
4 / 10
देशात एकीकडे कंपनीने तामिळनाडू येथे आयफोन उत्पादन करणारी फॅक्टरी उभारण्याचं घोषित केले आहे त्यावेळी ही बातमी समोर आली. टाटा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं आसाम राज्यात जगीरोड इथं एक इलेक्ट्रॉनिक सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.
5 / 10
टाटा समुह सेमीकंडक्टर असेंबली आणि पॅकेजिंग प्लांटसाठी आसाम सरकारशी संवाद साधत आहे. त्यामुळे आगामी १-२ महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे आसाममध्ये १ हजार लोकांना रोजगार मिळू शकतो.
6 / 10
टाटा भारतातील सर्वात मोठ्या आयफोन निर्मिती फॅक्टरीवर काम करण्याची योजना आखत आहे. Apple चीनवरील निर्भरता कमी करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. अशावेळी भारत यात पुढाकार घेत आहे.
7 / 10
टाटा कंपनी तामिळनाडू राज्यातील होसूर येथे फॅक्टरी उभारणार आहे. त्यात २० असेंबली लाईन आणि ५० हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. हा प्लांट १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत सुरू होण्याची शक्यता आहे.
8 / 10
याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा म्हणाले की, 'आपल्यासाठी एक फार चांगली बातमी आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने जगीरोडमध्ये एक इलेक्ट्रॉनिक केंद्र स्थापन करण्यासाठी एक अर्ज सादर केला आहे.त्यांनी जवळपास ४० हजार कोटी रुपयांच्या खर्चासाठी भारत सरकारकडे एक प्रपोजल सादर केले आहे.
9 / 10
टाटा समूहाने सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि पॅकेजिंग प्लांट संदर्भात राज्य सरकारसोबत सुरुवातीची चर्चा केली आहे आणि येथून समाधानी होऊन त्यांनी केंद्रासोबत संपर्क साधला आहे. महत्वाचे म्हणजे, मोरीगाव जिल्ह्यातील जगीरोड, राज्यातील सर्वात मोठे शहर गुवाहाटी पासून जवळपास ५५ किलोमीटर अंतरावर आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
10 / 10
चीन एक मोठा मॅन्युफॅक्चरिंग हब असलेला देश आहे. चीनची अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहे. चीन स्वस्त सामान जगातील बाजारपेठेत विकते. त्यात स्मार्टफोन, त्याचे पार्ट्स आणि अन्य साहित्यांचा समावेश आहे. परंतु टाटा समुहाच्या या पाऊलामुळे चीनसमोर आव्हान निर्माण होणार आहे.
टॅग्स :chinaचीनTataटाटाInvestmentगुंतवणूक