शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata लवकरच लॉन्च करणार UPI अॅप, Google Pay आणि Phonepeला जोरदार टक्कर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:14 PM

1 / 8
टाटा समूह (Tata Group) लवकरच Google Pay, Phonepe आणि Paytm सारख्या डिजिटल पेमेंट अॅप्सशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.
2 / 8
टाटा समूह आधीच अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे, आता तो युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित डिजिटल पेमेंट अॅप देखील सादर करणार आहे.
3 / 8
यासाठी टाटा समूह नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
4 / 8
UPI अॅप टाटा समूहाच्या डिजिटल कॉमर्सचा भाग असेल. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, UPI सिस्टमची सुरुवात करण्यासाठी टाटाची आयसीआयसीआय बँकेशीही चर्चा सुरू आहे.
5 / 8
महत्वाची बाब म्हणजे, नॉन-बँकिंग प्लॅटफॉर्मला UPI सुविधा कार्यक्षमतेसाठी बँकेसोबत भागीदारी करणे आवश्यक आहे. जर व्यवहारांचे प्रमाण जास्त असेल तर कंपन्या अनेक बँकांशी करार करुन व्यवहार करतात.
6 / 8
अहवालात असे सांगण्यात आले आहे की, आपला व्यवहार वाढवण्यासाठी Google Pay ने यासाठी SBI, HDFC आणि ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे. भारतातील बहुतांश UPI व्यवहार Google Pay आणि PhonePe द्वारे केले जातात.
7 / 8
पेटीएम, अॅमेझॉन पे आणि व्हॉट्सअॅप पे सारख्या इतर अॅप्सचा मार्केट शेअर कमी आहे. टाटा समूहाच्या आगमनानंतर यामध्ये गतिमान बदल होऊ शकतो. टाटा डिजिटलची स्थापना 2019 मध्ये झाली, हे टाटा सन्सच्या अंतर्गत येते.
8 / 8
या वर्षी जानेवारीमध्ये टाटा समूहाने आर्थिक उत्पादनांसाठी आर्थिक बाजारपेठही स्थापन केली. बिगबास्केट, 1MG Technologies Private Limited सोबत कंपनी डिजिटल क्षेत्रातही चांगली कामगिरी करत आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाPaytmपे-टीएमgoogle payगुगल पे