TATA's Megaplan; You will get an 'India Made' iPhone; 28000 people will get jobs
TATA चा मेगाप्लॅन; तुमच्या हाती येणार 'इंडिया मेड' iPhone; 28000 लोकांना मिळणार नोकरी By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 4:41 PM1 / 8 TATA iPhone : देशातील आघाडीचा टाटा ग्रुप नेहमीच काहीतरी मोठे काम करण्याचा प्रयत्न करतो. अलीकडेच टाटाने 'मेक इन इंडिया' आयफोन बनवण्यासाठी अॅपलसोबत मोठा करार केला आहे. 2 / 8 याअंतर्गत आता तुम्हाला भारतात तयार झालेले आयफोन मिळू शकतील. आता कंपनीला भारतात आयफोन निर्मितीचा वेग दुप्पट करायचा आहे. यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.3 / 8 आपल्या कामाचा वेगाने विस्तार करण्यासाठी टाटा समूहाची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड $ 125 मिलियनमध्ये खरेदी केली आहे.4 / 8 विस्तार योजनेअंतर्गत टाटा होसूर आयफोन युनिटमध्ये सुमारे 28000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. या युनिटचा विस्तार करण्यासाठी त्याची क्षमताही वाढवण्यात येणार आहे.5 / 8 या युनिटमध्ये एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 1 ते 1.5 वर्षात कंपनी 25 ते 28 हजार लोकांना कामावर ठेवेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी सध्याच्या क्षमतेच्या 1.5-2 पटीने युनिटचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.6 / 8 विस्ट्रॉन 2008 मध्ये भारतात आली, कंपनीने 2017 मध्ये Apple साठी आयफोन तयार करण्यास सुरुवात केली. या प्लांटमध्येच आयफोन 14 मॉडेलची निर्मिती करण्यात आली.7 / 8या प्लांटमध्ये 10,000 हून अधिक कामगार काम करतात, आता टाटा कंपनीने हा प्लांट खरेदी केला आहे. या ठिकाणी कामगारांची संख्या वाढवण्यात येणार आहे. 8 / 8टाटांनी ही कंपनी विकत घेतल्यानंतर विस्ट्रॉन भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडली आहे. दरम्यान, विस्ट्रॉन कंपनीशिवाय Pegatron आणि Foxconn देखील भारतात आयफोन तयार करतात. आता भारतीय कंपनी टाटानेही या यादीत प्रवेश केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications