Tata's titan shares shined Jhunjhunwala's wealth increased by 300 crores in one day
टाटाचा शेअर चमकला! एका दिवसात 300 कोटींनी वाढली झुनझुनवालांची संपत्ती By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 1:19 AM1 / 7टाटा समूहाची कंपनी असलेल्या टायटनच्या शेअर्समध्ये शुक्रवारी आलेल्या तेजीने रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत केवळ एकाच दिवसात 300 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टायटनचा शेअर शुक्रवारी जवळपास 2.5 टक्क्यांनी वाढून 2734.95 रुपयांवर बंद झाला.2 / 7टायटनचा शेअर गुरुवारी 2669.70 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात टायटनचा शेअर एकाच दिवसात 65.25 रुपयांनी वाढला आहे. रेखा झुनझुनवाला या दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. त्यांचा टायटनमध्ये मोठा वाटा आहे.3 / 71 दिवसांत अशी वाढली रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती - टायटन कंपनीच्या मार्च 2023 तिमाहीच्या लेटेस्ट शेअर होल्डिंगनुसर, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,69,45,970 शेअर अथवा 5.29 टक्के वाटा आहे. टायटनचा शेअर शुक्रवारी 65.25 रुपयांनी वधारला. टायटनच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे, रेखा झुनझुनवाला यांची नेटवर्थ 3,051,488,050 रुपयांनी वाढली आहे. 4 / 7गेल्या एका वर्षात टायटनचा शेअर जवळपास 24 टक्क्यांनी वधारला होता. टाटा समूहाच्या या कंपनीचा शअर एका वर्षात 2207.60 रुपयांवरून 2734.95 रुपयांवर पोहोचला आहे.5 / 7रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले आणखी शेअर - रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2023 च्या तिमाही दरम्यान टायटन कंपनीचे आणखी शेअर्स विकत घेतले आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ऑक्टोबर-डिसेंबर 2022, या तिमाहीत टायटनचे 4,58,95,970 एवढे शेअर्स अथवा कंपनीतील 5.17% हिस्सा होता. यानंतर, जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,69,45,970 एवढे शेअर्स अथवा 5.29% हिस्सेदारी झाली आहे. याचाच अर्थ रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2023 च्या तिमाहीदरम्यान टायटनचे आणखी 10.50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत.6 / 73 वर्षांत शेअरमध्ये 230 टक्क्यांची वाढ - टायटनचा शेअर गेल्या 3 वर्षांत 230 टक्क्यांनी वाढला आहे. 8 मे 2020 रोजी कंपनीचा शेअर्स BSE वर 833.10 रुपयांवर होता. तो 5 मे 2023 रोजी 2734.95 रुपयांवर वर बंद झाला. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांक 2790 रुपये तर नीचांक 1827.15 रुपये एवढा आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications