शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

9.45/10.59 ? तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी कोणती वेळ योग्य? मिळेल कन्फर्म बर्थ मिळेल....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:57 PM

1 / 6
Tatkal Ticket Booking : तुमच्यापैकी अनेकांनी ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC या अॅपचा वापर केला असेल. यावर अनेकदा तत्काळ तिकीट बुक करताना तुम्ही योग्य वेळी लॉगिन करता, तरीदेखील तुम्हाला तिकीट मिळत नाही. काहीवेळा असेही घडते की, तुम्ही योग्य वेळी लॉग इन करण्याचा प्रयत्न करता, पण जास्त ट्रॅफिकमुळे वेबसाइटच हँग होते. दरम्यान, तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 6
तत्काळ बुकिंग कधी सुरू होते? तुम्ही IRCTC साईटवरुन तत्काळ तिकीट कधी बुक करू शकता हे जाणून घ्या. नियमांनुसार एसी श्रेणीतील गाड्यांसाठी तत्काळ तिकीट बुकिंग दररोज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते, तर स्लीपर श्रेणीच्या गाड्यांसाठी तत्काळ तिकीट बुकिंग दररोज सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते.
3 / 6
लॉग इन कधी करावे? एसी किंवा स्लीपर बुक करण्यासाठी तुम्ही निर्धारित वेळेच्या 3-5 मिनिटे आधी लॉग इन केले पाहिजे. असे केल्याने कोणत्याही त्रासाशिवाय योग्य वेळी लॉग इन होण्याची शक्यता वाढते.
4 / 6
ही चूक अजिबात करू नका तुम्ही हेदेखील लक्षात ठेवा की, तत्काळ बुकिंगसाठी तुम्ही कधीही 10-15 मिनिटे अगोदर लॉग इन करू नये. असे केल्याने विंडो उघडल्यावर तुमचे लॉगिन सत्र ताबडतोब एंड होऊ शकते.
5 / 6
यावेळी अजिबात लॉगिन करू नका तुम्ही वेळेपूर्वी किंवा शेवटच्या 1-2 मिनिटांत कधीही लॉग इन करू नये. असे केल्याने तुमचे लॉगिन हार्ड ट्रॅफिकमुळे अडकू शकते.
6 / 6
मास्टर लिस्ट तयार करा तत्काळ बुकिंग करण्यापूर्वी तुम्ही IRCTC च्या अधिकृत साइटला भेट देऊन एक मास्टर लिस्ट देखील बनवू शकता. असे केल्याने, तत्काळ बुकिंगच्या वेळी प्रवाशांचे तपशील भरण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेticketतिकिटbusinessव्यवसायTravel Tipsट्रॅव्हल टिप्स