शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Income Tax Saving Tips: 10 लाख उत्पन्न असले तरी 1 रुपयाही कर लागणार नाही; असा वाचवा इन्कम टॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 4:01 PM

1 / 9
जर तुम्हाला १० लाख पगार असेल किंवा उत्पन्न असेल तर तुम्हाला कर द्यावा लागतो. सरकारने पाच लाखांपर्यंत करमाफी केलेली आहे. परंतू, वरच्या ५ लाखांसाठी आयकर विभागाला कर द्यावा लागतो. यातून वाचायचे असेल, म्हणजेच तुमचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला काही गुंतवणुकीच्या पळवाटा आहेत. यातून एक रुपयाचाही कर द्यावा लागणार नाही. आयकर विभागानेच ही सूट दिलेली आहे.
2 / 9
तुम्हाला १० लाखांपेक्षा एक रुपया जरी उत्पन्न मिळत असले तरी तुम्ही ३० टक्के कर भरण्यास पात्र ठरता. हा कर वाचवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नापैकी काही रक्कम गुंतवावी लागणार आहे. कसे ते पाहुया...
3 / 9
जर तुमचा पगार 10.5 लाख रुपये असेल, तर सर्वप्रथम सरकारने स्टँडर्ड डिडक्शन म्हणून दिलेले 50 हजार वजा करावेत. अशा प्रकारे तुमचे करपात्र उत्पन्न आता १० लाख रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला १० लाखांवर कर द्यावा लागेल.
4 / 9
आता तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांवर करात सूट मिळवू शकता. यामध्ये तुम्ही मुलांची शिकवणी फी, PPF, LIC, EPF, म्युच्युअल फंड (ELSS), गृहकर्जाची रक्कम आदीवर दावा करू शकता. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न आता 8.5 लाख रुपये होईल.
5 / 9
आता तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांवर करात सूट मिळवू शकता. यामध्ये तुम्ही मुलांची शिकवणी फी, PPF, LIC, EPF, म्युच्युअल फंड (ELSS), गृहकर्जाची रक्कम आदीवर दावा करू शकता. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न आता 8.5 लाख रुपये होईल.
6 / 9
पुढची पन्नास हजाराची रक्कम करमुक्त करण्यासाठी तुम्हाला 80CCD(1B) अंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत गुंतवणूक करावी लागेल. अशा प्रकारे तुमचा करपात्र पगार 8 लाख रुपयांवर येईल.
7 / 9
आयकर विभागाच्या कलम 24B अंतर्गत, तुम्ही 2 लाख रुपयांच्या गृहकर्जाच्या व्याजावर कर सूट मागू शकता. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न 6 लाख रुपयांवर येईल.
8 / 9
आयकराच्या कलम 80D अंतर्गत तुमच्या कुटुंबासाठी (पत्नी आणि मुलांसाठी) 25 हजार रुपयांच्या वैद्यकीय आरोग्य विम्याच्या प्रीमियमचा दावा करू शकता. तसेच आई-वडील यांचाही आरोग्य विमा दाखवू शकता. ही रक्कम ५० हजारापर्यंत दाखवू शकता. म्हणजेच तुम्ही एकूण ७५ हजार रुपयांवर सूट मिळवू शकता. आता तुमचे करपात्र उत्पन्न 5.25 लाखांवर येईल.
9 / 9
पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. मग तुम्ही उरलेले 25 हजार रुपये कोणत्याही संस्थेला किंवा ट्रस्टला दान करू शकता. त्यावर आयकर कलम 80G अंतर्गत दावा करू शकता. 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के दराने तुमचा कर 12,500 रुपये होतो. मात्र यावर सरकारकडून सूट आहे. यामुळे तुमचे कर दायित्व शून्य होते.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सEmployeeकर्मचारी