शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tax Saving Idea: नोकरी करत असाल तर कर वाचविण्याची ही पहिली आयडिया; मग बाकीच्या ट्रिक वापरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 2:56 PM

1 / 8
आर्थिक वर्ष 2022-23 संपायला आता काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. नोकरदार वर्गाच्या पगारातून कराचे पैसे कंपन्या कापायला सुरुवात करतील. यामुळे कर वाचविण्यासाठी करदात्यांकडे फार कमी वेळ राहिला आहे.
2 / 8
गुंतवणूक करणाऱ्यास सल्लागार कंपन्यांचे फोनही यायला सुरुवात झाली असेल, नोकरदार अनेक प्रकारच्या ट्रिक वापरत असतील. परंतू आम्ही तुम्हाला अशी सॉलिड गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही आरामात कर वाचवू शकणार आहात.
3 / 8
हाऊस रेंट अलाऊन्स हा असा एक मार्ग आहे जो नोकरदार वर्गाचा कर मोठ्या प्रमाणावर वाचवितो. एचआरए हा कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगाराचा एक भाग असतो. तुमची सॅलरी स्लिप पाहिल्यावर त्यात HRA चा कॉलम दिसेल.
4 / 8
HRA हा पगाराचा करपात्र भाग नाही. याद्वारे तुम्ही सहज कर वाचवू शकता. त्यावर दावा करण्यासाठी करदात्यांनी भाड्याच्या घरात राहावे, अशी अट आहे. तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 10 (13A) अंतर्गत भाडे भत्त्यातून कर सूट मागू शकता.
5 / 8
करदाता HRA वर किती कर वाचवू शकतो? हे मुख्यतः तीन अटींवर अवलंबून असते. पहिला म्हणजे तुमच्या पगारात HRA चा वाटा किती आहे. दुसरे- जर तुम्ही दिल्ली, मुंबई, कोलकाता सारख्या मेट्रो शहरात राहत असाल तर HRA मूळ वेतनाच्या 50% असेल.
6 / 8
नॉन-मेट्रोसाठी एचआरए पगाराच्या 40 टक्के आहे. तिसरे म्हणजे घरासाठी भरलेल्या वार्षिक भाड्यातून वार्षिक पगाराच्या 10% वजा केल्यावर उर्वरित रक्कम. तुम्हाला तुमचा HRA काढायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला एका आर्थिक वर्षात किती HRA मिळाला आहे ते पहा. त्यासाठी मूळ पगारासह महागाई भत्ता आणि इतर गोष्टीही जोडल्या गेल्या पाहिजेत. तरच तुम्ही तुमचा कर वाचवू शकाल.
7 / 8
तुम्ही भाडे म्हणून दर महिन्याला 15,000 रुपये भरता. तुमचा मूळ पगार 25,000 हजार रुपये आणि DA 2000 रुपये आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कंपनीकडून एक लाख रुपये HRA म्हणून मिळतात. एचआरए म्हणून जास्तीत जास्त एक लाख रुपये कर वाचवू शकता.
8 / 8
HRA चा दावा करण्यासाठी तुमच्याकडे वैध भाडे करार असणे आवश्यक आहे. तुम्ही आणि घरमालकाने करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. तसेच, करारनामा 100 किंवा 200 रुपयांचा स्टॅम्प पेपर असावा. वार्षिक भाडे एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर घरमालकाचा पॅन पावतीसह देणे बंधनकारक आहे.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स