Tax Saving: Want to save tax legally? Here are the best 8 solutions!
Tax Saving : कायदेशीररीत्या कर वाचवायचा आहे? करा हे सर्वोत्तम ८ उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 10:31 AM1 / 9करदाते प्राप्तिकर वेळेवर भरण्यापेक्षा तो कसा वाचवता येईल यासाठी बरीच मेहनत घेताना दिसतात. कर ही अनेकांसाठी डोकेदुखी असते. प्राप्तिकर देशाला बळकट करण्यासाठी आणि कामकाज सुरळीत करण्यासाठी अतिशय आवश्यक असतो. कर चुकवण्यासाठी राजकीय नेते, सेलिब्रिटी दुसऱ्या देशात आपली मालमत्ता ठेवतात. कर्मचारी, मध्यमवर्गीय करदाते कायदेशीररीत्या प्राप्तिकरातून कशी सूट मिळवू शकतात यासाठी सर्वोत्तम ८ उपाय....2 / 9कलम ८० सी च्या अंतर्गत आपण दीड लाख रुपयांपर्यंतचा प्राप्तिकर वाचवू शकतो. ही मर्यादा दोन लाख रुपये करण्याची मागणी आहे. ८० सी च्या अंतर्गत आपण ईपीएफ, पीपीएफ, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस), सुकन्या समृद्धी योजना, टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यामध्ये गुंतवणूक करू शकता. 3 / 9केंद्र सरकार विविध कार्यांसाठी नेहमीच मदतीचे आवाहन करत असते. पीएम रिलीफ फंड, स्वच्छ भारत निधी, स्वच्छ गंगा, मादक पदार्थांच्या गैरवापरावर नियंत्रणासाठी निधी दिल्यानंतर सरकार या देणगीवर ८० सी च्या अंतर्गत १०० टक्के कर सवलत देते.4 / 9गृहकर्जावरील मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात कर वाचवू शकता. यासाठी तुम्ही ८० सी च्या अंतर्गत करामध्ये सूट देण्याची मागणी करू शकता. गृहकर्जावर २ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.5 / 9शैक्षणिक कर्जाच्या व्याज परतफेडीवर संपूर्ण कर सवलत केंद्र सरकारने दिली आहे. शिक्षणावरील कर्जाची रक्कम किती असावी यासाठी कोणतीही मर्यादा सरकारने निश्चित केलेली नाही. शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कर-बचतीचा लाभ मिळविण्यासाठी अनुभवी व्यक्तीशी सल्लामसलत करा.6 / 9सर्व वैयक्तिक खर्च तुम्हाला कर वाचविण्यात मदत करू शकतात. स्वतःसाठी आणि मुलांसाठी शिक्षण, स्वत:साठी किंवा जोडीदारासाठी किंवा मुलांसाठी विमा प्रीमियम भरणे, तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणी, उपचारावर केलेल्या खर्चावर कुटुंबातील व्यक्तींसाठी केलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या खर्चातून आपण करातून सूट मिळवू शकतो.7 / 9आपल्याकडे अनेक वर्षांपासून असलेली एखादी मालमत्ता जर आपण विक्री केली तर आपल्याला कॅपिटल गेन टॅक्समधून सूट मिळू शकते. यासाठी तुमची मालमत्ता ३ वर्षे जुनी असली पाहिजे. तुम्ही एक वर्षापेक्षा अधिक काळ आपल्या जवळ बाळगलेल्या शेअर्स (समभाग), म्युच्युअल फंडची विक्री केली तरी आपल्याला करातून सूट मिळू शकते.8 / 9नोकरीसाठी केलेले कित्येक खर्च हे कर सवलतीसाठी पात्र असतात. तुम्ही तुमच्या कंपनीला विनंती करून आपले घरभाडे, प्रवास खर्च, गणवेश, दूरध्वनी, व्यक्तिमत्त्व विकास, वैद्यकीय उपचार यासारखे खर्च पगारात दाखवून करामध्ये सवलत मिळवू शकता.9 / 9जर तुमची कंपनी तुम्हाला सुट्टीमध्ये सहलीसाठी एक ठराविक रक्कम देत असेल तर त्याचा वापर आपण करून कर वाचवू शकतो. चार वर्षांतून दोन वेळा आपण हा सहल खर्च दाखवू शकतो. तुमची सहल भारतामध्येच असावी इतकीच अट यामध्ये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications