शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Top 5 ELSS Fund : पैशांचा पाऊस! एका वर्षात दिले तब्बल ८१ टक्के रिटर्न्स; 'हे' आहेत टॉप ५ ELSS फंड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:12 PM

1 / 6
म्युच्युअल फंड योजनांचा खरा फायदा दीर्घकाळातच मिळतो. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून आकर्षक परताव्यासह चक्रवाढीचा मोठा लाभ मिळतो. या फंडात जितकी जास्त गुंतवणूक केली जाईल तितका मजबूत परतावा गुंतवणूकदारांना मिळतो. यातही काही म्युच्युअल फंड योजनांनी १ वर्षाच्या कमी कालावधीतही भरघोस परतावा दिला आहे. यापैकी 5 ELSS योजनांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी गेल्या १ वर्षात ८१ टक्के इतका मोठा परतावा दिला आहे.
2 / 6
SBI लाँग टर्म इक्विटी फंडाने गेल्या १ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 56.94 टक्के परतावा दिला आहे. SBI च्या या ELSS फंडाचा सध्याचा आकार 28,000 कोटी रुपये आहे.
3 / 6
डीएसपी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या एका वर्षात ५७.०९ टक्के परतावा दिला आहे. त्यांचा सध्याचा निधी १७,४८८ कोटी रुपये आहे.
4 / 6
HSBC ELSS टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना ६१.४४ टक्के परतावा दिला आहे. त्यांचा सध्याचा निधी आकार सुमारे ४४२१ कोटी रुपये आहे.
5 / 6
JM ELSS टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या १ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना ६३.७० टक्के मजबूत परतावा दिला आहे. त्यांचा सध्याचा निधी १८१ कोटी रुपये आहे.
6 / 6
मोतीलाल ओसवाल यांच्या ELSS टॅक्स सेव्हर फंडाने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक ८१.२९ टक्के परतावा दिला आहे. या निधीचा सध्याचा आकार सुमारे ३९८४ कोटी रुपये आहे. ((Disclaimer- यामध्ये ELSS फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकTaxकरMONEYपैसाshare marketशेअर बाजार