शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 10:44 AM

1 / 7
Tax Savings in FY25, Time Deposit: आज अनेक जण गुंतवणूकीसाठी निरनिराळ्या पर्यायांच्या शोधात असतात. शेअर बाजारात जरी परतावा अधिक मिळत असला तरी त्या स्कीम्स बाजाराशी निगडीत असल्यानं त्यात जोखीम अधिक असते. म्हणून अनेक जण गुंतवणूकीच्या सुरक्षित पर्यायांचा विचार करताना दिसतात.
2 / 7
पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना 'टाइम डिपॉझिट' ही करबचतीसाठी चांगली योजना आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंट (Post Office Time Deposit Account) देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडलं जाऊ शकतं. या योजनेतील ठेवींवरील कर तुम्ही ५ वर्षांसाठी वाचवू शकता. सध्या करप्रणालीत दोन प्रकारची करप्रणाली आहे. नवी करप्रणाली आणि जुनी करप्रणाली. कलम ८० सी च्या कर वजावटीचा दावा जुन्या कर प्रणालीतच केला जाऊ शकतो.
3 / 7
पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम जोखीममुक्त असल्यामुळे भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटसारखीच आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाऊंट १, २, ३ आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही शाखेत उघडलं जाऊ शकतं.
4 / 7
या स्कीममध्ये ५ वर्षांच्या डिपॉझिटवर टॅक्स डिडक्शनचा फायदा घेता येतो. या स्कीममध्ये १ वर्षासाठी ६.९ टक्के, २ वर्षांसाठी ७ टक्के, ३ वर्षांसाठी ७.१ टक्के आणि ५ वर्षांसाठी ७.५ टक्के व्याज देण्यात येत आहे. इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ च्या सेक्शन ८० सी नुसार ५ वर्षांच्या डिपॉझिटवर १.५ लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स डिडक्शनचा दावा केला जाऊ शकतो. जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या फिक्स्ड डिपॉझिटचा उत्तम पर्याय आहे.
5 / 7
पोस्ट ऑफिस नेटबँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन तसंच ऑफलाइन खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खातं सिंगल किंवा जॉईंट (३ सदस्यांपर्यंत) उघडता येतं. ते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. अल्पवयीन मुलांना लीगल गार्डियनच्या मदतीनं खातं उघडता येतं. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा जास्त खाती उघडता येतात. खात्यात नॉमिनेशनची सुविधा आहे.
6 / 7
या खात्यात मुदतपूर्तीपूर्वी किंवा त्यापूर्वी पैसे काढण्याची सुविधा असते. याला प्री-मॅच्युअर विड्रॉल म्हणतात. नियमांनुसार, खातं उघडल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांनंतर प्री-मॅच्युअर पैसे काढता येतात. खातं उघडल्याच्या तारखेपासून ६-१२ महिन्यांच्या कालावधीत पैसे काढल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दरांच्या आधारे व्याज मिळेल.
7 / 7
या स्कीममध्ये किमान १००० रुपयांपासून खातं उघडता येतं. यानंतर १०० रुपयांच्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता. मॅच्युरिटीनंतर रक्कम न काढल्यास जमा रकमेवर कोणत्याही प्रकारचं व्याज दिलं जात नाही.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा