शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TDS, KYC, दुचाकीच्या किमती, १ जुलैपासून होणार मोठे बदल, त्वरित लक्ष द्या, अन्यथा होईल मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 4:18 PM

1 / 7
१ जुलैपासून आर्थिक देवाण-घेवाणीशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यामधील काही नियमांचा तुमच्या खिशावरही परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात १ जुलैपासून होणाऱ्या या बदलांविषयी.
2 / 7
१ जुलैनंतर क्रिप्टोकरंसीसाठी करण्यात आलेली देवाण-घेवाण एक वर्षामध्ये १० हजार रुपयांपेक्षा अधिक असले तर त्यावर एक टक्के चार्ज लावला जाईल. याच्या चौकटीत सर्व एनएफटी किंवा डिजिटल करन्सी येईल.
3 / 7
१ जुलै २०२२ पासून व्यवसायातून मिळालेल्या गिफ्टवर १० टक्के दराने टीडीएस द्यावं लागेल. हा टॅक्स सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि डॉक्टरांवरही लागू होईल. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सना कंपनीने मार्केटिंगसाठी दिलेले प्रॉडक्ट स्वत:कडे ठेवल्यास टीडीएस द्यावा लागेल. मात्र ते प्रॉडक्ट परत केल्यास टीडीएस द्यावं लागणार नाही.
4 / 7
१ जुलैपासून पेमेंट गेटवे, मर्चंट, पेमेंट अॅग्रिगेटर आणि अधिग्रहण करणाऱ्यांना बँक कार्ड डिटेल सेव्ह करता येणार नाही. हा नियम लागू झाल्यानंतर ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या ग्राहकांची कार्ड डिटेल्स आपल्याजवळ सुरक्षित ठेवू शकणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या डेटाचं रक्षण होईल.
5 / 7
डीमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटसाठी केवायसी करण्याची अखेरची तारीख ३० जून आहे. ज्या खात्यांची या तारखेपर्यंत ई-केवायसी नसेल ती निष्क्रिय होतील. एक जुलैपासून अशा अकाऊंटच्या मदतीने शेअर ट्रेडिंग होणार नाही. डीमॅट अकाऊंटमध्ये शेअर आणि सिक्युरिटी ठेवण्याची सुविधा दिली जात आहे. अशा परिस्थितीत ३० जूनपर्यंत तुम्ही तुमच्या डिमॅट अकाऊंट आणि ट्रेडिंग अकाऊंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, ३० जूननंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
6 / 7
दंडासह पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. ३० जूनपर्यंत ५०० रुपये दंड आहे. तर १ जुलैपासून पॅन कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी १ हजार रुपये दंड द्यावा लागेल.
7 / 7
१ जुलैपासून दुचाकी वाहनांची दिग्गज कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीची वाहने ३ हजार रुपयांपर्यंत महाग होणार आहेत. सतत वाढत असलेल्या महागाईमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. हीरो प्रमाणेत इतर कंपन्यांच्या दुचाकीच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसाAdhar Cardआधार कार्ड