शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकसारखे ५० देश विकत घेईल इतका पैसा; 'या' व्यक्तीचं नाव श्रीमंताच्या यादीत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 5:45 PM

1 / 10
एलॉन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्ट, जेफ बेझोस, बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांच्यासह जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्ही ऐकली असतील. पण, याहूनही मोठं आणखी एक नाव आहे, ज्याबद्दल लोकांना अजून माहिती नाही. ही व्यक्ती जगातील करोडो लोकांचा पैसा सांभाळते.
2 / 10
जगातील जवळपास प्रत्येक मोठ्या कंपनीत या व्यक्तीची हिस्सेदारी आहे. जगाच्या संपत्तीचा काही भाग हा माणूस नियंत्रित करतो असेही म्हणता येईल. तो जगाचा पैसा आणि शेअर बाजार त्याला हवे तिथे हलवू शकतो. मात्र, वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत तो अब्जाधीश व्यावसायिकांपेक्षा मागे आहे.
3 / 10
आम्ही अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय गुंतवणूक कंपनी ब्लॅकरॉक इंक (BlackRock Inc) च्या संस्थापकाबद्दल बोलत आहोत. ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. एसेट अंडर मॅनेजमेंट 9.43 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. ही रक्कम भारतीय चलनात लिहिणे सोपे नाही. उच्चार करणे आणखी कठीण आहे. एकूण रक्कम 78,54,75,62,20,00,000 रुपये (७८ लाख कोटींहून अधिक) असेल.
4 / 10
विशेष म्हणजे हा आकडा अमेरिकेच्या जीडीपीच्या जवळपास निम्मा आहे आणि इतर अनेक देशांच्या जीडीपीच्या कित्येक पट आहे. इतका की पाकिस्तानसारख्या ५० देशांचा जीडीपी कमी पडतो. या व्यक्तीचं नाव आहे लॅरी फिंक(Larry Fink)
5 / 10
ब्लॅकरॉक इंक ही जगातील सर्वात पॉवरफूल एसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. १९८८ मध्ये लॅरी फिंक यांनी या कंपनीचा पाया रचला. शेअर मार्केटमध्ये रस असल्याने ते या सेक्टरमध्ये आले. त्यानंतर फिंक यांनी जे यशाचे शिखर गाठले त्याचा कुणीही विचारही केला नसेल.
6 / 10
ब्लॅकरॉकच्या ताकदीचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, जगभरातील एकूण शेअर, बॉन्ड्सचा जवळपास १० टक्के भाग ही कंपनी सांभाळते, जगातील प्रत्येक बड्या कंपनीत यांची भागीदारी आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी शेडो बँक म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
7 / 10
एसेट मॅनेजमेंट कंपनी अशी फर्म असते जी क्लाईंट्सकडून मिळालेला फंड हा शेअर बाजारात किंवा अन्य क्षेत्रात गुंतवणूक करते. स्थावर संपत्ती, बॉन्ड, स्टॉक इत्यादीचा समावेश असतो. एसेट मॅनेजमेंट कंपनीला मिळणारा पैसा हा क्लाईंट्सकडून मिळतो.
8 / 10
मार्केट कॅपचा विचार केला तर जगातील नावाजलेली मोठी कंपनी Apple मध्ये ब्लॅकरॉकची ६.५ भागीदारी आहे. फेसबुकमध्ये ६.५ टक्के, जेपी मॉर्गन ६.५ टक्के, डॉयचे बँक ४.८ टक्के भागीदारी आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकमध्ये ब्लॅकरॉकचे ४.४८ टक्के शेअर्स आहेत. फॉर्ब्स मॅगजीन एप्रिल २०२२ नुसार लॅरी फिंक यांची एकूण संपत्ती १ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे.
9 / 10
लॅरी फिंक यांनी 1988 मध्ये कंपनीची स्थापना केली होती. फिंक हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. फिंकने राज्यशास्त्राचा अभ्यास केला होता, पण पैसे कमवण्याच्या मोहात शेअर बाजारात प्रवेश केला. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी बोस्टन डायनॅमिक्समधून करिअरला सुरुवात केली. डेट सिंडिकेशन सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. वयाच्या ३१ व्या वर्षी ते बँकेचे एमडी झाले.
10 / 10
आज, BlackRock जगभरातील कंपन्या आणि सरकारांची मालमत्ता व्यवस्थापित करते. यामध्ये पेन्शन फंडाचाही समावेश आहे. फिंक यांचा व्यवसाय भारताच्या जीडीपीपेक्षा ३ पट अधिक आहे. भारताचा जीडीपी सुमारे ३ ट्रिलियन आहे तर या व्यक्तीचा व्यवसाय ९ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजार