शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोट्यधीश बनण्याचा १२X३०X१२ फॉर्म्युला; केवळ ₹१००० 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करा आणि पाहा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 10:24 AM

1 / 7
एसआयपी हा आजकाल गुंतवणुकीचा आवडता पर्याय बनला आहे. या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. बाजाराशी निगडीत असूनही ही योजना झपाट्यानं लोकप्रिय होत आहे. याचं कारण म्हणजे शेअर्समध्ये थेट पैसे गुंतविण्यापेक्षा त्यात कमी जोखीम असते.
2 / 7
५०० रुपयांच्या छोट्या रकमेतून तुम्ही एसआयपी सुरू करू शकता. याशिवाय लाँग टर्ममध्ये या स्कीममध्ये तुम्हाला कंपाउंडिंगचा भरपूर फायदा मिळतो, ज्यामुळे व्यक्ती मोठा निधी तयार करू शकते. तुम्ही इच्छित असाल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वत:ला करोडपती देखील बनवू शकता. येथे जाणून घ्या तो फॉर्म्युला ज्याअंतर्गत तुम्ही फक्त १,००० रुपयांची एसआयपी सुरू करूनही स्वत:ला कोट्यधीश बनवू शकता.
3 / 7
एसआयपीमधील १२X३०X१२ फॉर्म्युला तुम्हाला कोट्यधीश बनवू शकतो. हे सूत्र लागू करण्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. या सूत्रात १२ म्हणजे १२% वार्षिक टॉप-अप. म्हणजेच जर तुम्ही १,००० रुपयांपासून एसआयपी सुरू करत असाल तर तुम्हाला दरवर्षी १२% टॉप-अप करावं लागेल. ३० म्हणजे ३० वर्षांपर्यंत, म्हणजे तुम्हाला ३० वर्षे एसआयपी चालवावी लागेल आणि दुसरं १२ म्हणजे एसआयपीवर १२% परतावा.
4 / 7
समजा तुम्ही या योजनेत १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला एका वर्षासाठी दरमहा फक्त १,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पुढील वर्षी तुम्हाला ही रक्कम १२ टक्के म्हणजेच १२० रुपयांनी वाढवावी लागेल. आता तुमची रक्कम १,१२० रुपये होईल. वर्षभर दरमहा १,१२० रुपयांची एसआयपी चालवा आणि पुढील वर्षी त्यात पुन्हा १२% वाढ करा. तिसऱ्या वर्षी तुमची एसआयपी १,२५४ रुपये असेल.
5 / 7
अशा प्रकारे तुम्हाला सध्याच्या रकमेत दरवर्षी १२% वाढ करावी लागेल. अशा प्रकारे एसआयपी ३० वर्षे सुरू ठेवावी लागते. त्या व्यक्तीचं उत्पन्नही काळानुसार वाढत असल्याने त्याला १२ टक्के टॉपअप करणे अवघड काम नसतं. अशा प्रकारे ३० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक २८,९५,९९२ रुपये होईल.
6 / 7
यावर तुम्हाला १२ टक्के परताव्यानुसार ८३,४५,६११ रुपये मिळतील आणि ३० वर्षांनंतर मॅच्युरिटीची रक्कम १,१२,४१,६०३ रुपये होईल. अशा प्रकारे तुम्ही या फॉर्म्युल्याने स्वत:ला कोट्यधीश बनवू शकता.
7 / 7
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा