The craze for cryptocurrency but obstacles in the way of digital rupee rbi investment money
Cryptocurrency Digital Money : क्रिप्टो करन्सीची क्रेझ, पण डिजिटल रुपयाच्या मार्गात अडथळे? By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 1:01 PM1 / 9लोकांमध्ये, विशेषत: तरुणांमध्ये, क्रिप्टो करन्सीची असलेली क्रेझ पाहून भारतानेही नव्या आर्थिक वर्षात डिजिटल रुपया आणण्याचे ठरवले आहे. रिझर्व्ह बँकेने त्यासाठी तयारी चालवली आहे. परंतु त्यात काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागेल, असे दिसत आहे.2 / 9सीबीडीसी काय आहे म्हणजे काय? तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचे लघुरूप म्हणजे सीबीडीसी. याचा अर्थ असा की, देशची मध्यवर्ती बँक चलन डिजिटल स्वरूपात आणणार. या डिजिटल चलनाला कागदी रुपयाचे मूल्य असेल.3 / 9डिजिटल चलनाद्वारे व्यवहारही करता येतील. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल रुपया चलनात आणणार आहे.4 / 9डिजिटल रुपय ब्लॉकचेन तंत्रज्ञानाधारित असेल. क्रिप्टो करन्सी व्यवहारांना पर्याय म्हणून ही निर्मिती केली जाणार आहे.5 / 9बहामा, कॅरेबियन बेटांवरील सात देश आणि नायजेरिया या नऊ देशांनी डिजिटल चलन सुरू केले आहे.6 / 9दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, रशिया, स्वीडन, मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे चलन सुरू आहे. चीननेही हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत ई-सीएनवाय हे चलन अंमलात आणले.7 / 9डिजिटल चलनाद्वारे व्यवहार करण्यामध्ये मात्र अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. 8 / 9त्यामुळे ज्या देशांमध्ये डिजिटल चलन व्यवहारात आहे त्या देशांच्या मध्यवर्ती बँकांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.9 / 9अनेक बँकांमध्ये चलन व्यवहार सुरळीत होत नसल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेलाही डिजिटल चलन अंमलात आणल्यानंतर त्यात तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications