शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मॅकडोनाल्ड्सचा बॅनर पाहून आली आयडिया, वडापाव विकून उभी केली कोट्यवधींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 9:37 AM

1 / 8
आपण काहीतरी चांगलं करण्याचा विचार करत असतो तेव्हा असे अनेक लोक आपल्या समोर येतात जे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. पण मनात जिद्द आणि काहीतरी निराळं करण्याची इच्छा मनात असली तर असे लोक निराश आणि हताश न होता आपल्या मार्गावर चालत राहतात. यश मिळवून ते याला उत्तर देत असतात.
2 / 8
व्यंकटेश अय्यर हे त्यापैकीच एक आहेत. व्यंकटेश यांनी आपल्या कुटुंबातील लोकांच्या टोमण्यांना न जुमानता आपला प्रवास सुरू ठेवला आणि आज ते कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. आज त्यांच्या कंपनीचा व्यवसाय देशातच नाही तर परदेशातही पसरला आहे.
3 / 8
व्यंकटेशच्या व्यवसायातील यश पाहून हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयएमडी स्वित्झर्लंड आणि आयएसबी हैदराबाद सारख्या संस्थांनी याची केस स्टडी केली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यंकटेश यांनी एवढं मोठं यश मिळवून एक आदर्श निर्माण केलाय. ते सातत्यानं यशाची नवनवीन शिखरं गाठत आहेत. व्यंकटेश यांनी इतकं यश कसं मिळवले ते आपण जाणून घेऊ.
4 / 8
व्यंकटेश यांचा जन्म एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात झाला. जर अभ्यास केला नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही आणि मग वडापाव विकावा लागेल असं त्यांना लहानपणी सांगण्यात आलं होतं. मात्र व्यंकटेश यांच्या कुटुंबीयांना वाटलंही नव्हतं की केवळ वडापाव विकून एवढं यश मिळवतील. व्यंकटेश यांनी या वडापावमधून ५० कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे.
5 / 8
व्यंकटेश यांच्यावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा प्रभाव आहे. गरजू मुलांच्या शिक्षणासाठीही ते पाऊल उचलत आहेत. व्यंकटेश यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या यशाव्यतिरिक्त, शाळा सोडलेल्या दहावी पास विद्यार्थ्यांना कंपनीत काम करण्याची संधी मिळावी, हे त्यांचं स्वप्न आहे. वडापाव जागतिक बनवण्याची त्यांची इच्छा आहे.
6 / 8
सुमारे काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी व्यंकटेश यांनी मॅकडोनाल्डचा ४० फूट उंच बॅनर पाहिला होता. यावेळी त्यांच्या मनात एक प्रश्न आला की इथे परदेशातील बर्गर इतके प्रसिद्ध असू शकतात तर स्वदेशी वडा पाव का नाही. यानंतर त्यांनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
7 / 8
त्यानंतर २००४ मध्ये वेंकटेश यांनी गोली वडा पाव नावानं स्वतःची कंपनी सुरू केली. व्यंकटेश यांनी ही कंपनी वडा पाव बनवण्यासाठी सुरू केली. आज गोली वडा पाव कंपनीचे संस्थापक व्यंकटेश अय्यर यांच्या या कंपनीचे देशभरात ३५० आऊटलेट्स आहेत. त्यांनी त्यांचं पहिलं दुकान ठाण्यात उघडलं.
8 / 8
व्यंकटेश यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकजण आपापल्या घरी इडली, डोसा आणि पोंगल खातात. पण मुंबईत त्यांच्यासाठी वडा पाव हा चित्रपटातील 'आयटम नंबर'सारखा होता. महाविद्यालयीन पार्ट्यांपासून ते क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत वडा पाव हा सर्व कार्यक्रमांचा भाग असायचा. त्यामुळे वेकंटेश यांनी त्यांचा व्यवसाय म्हणून वडापावची निवड केली.
टॅग्स :businessव्यवसाय