शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाखाचा शेअर! टायर बनवणाऱ्या कंपनीची कमाल, ₹11 चा शेअर 1 लाखावर पोहोचला; 'फुगे' बनवणारी कंपनी अशी बनली MRF

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 12:11 PM

1 / 9
शेअर बाजारातील गुंतवणूक हा नशिबाचा खेळ आहे. येथे काही शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवतात, तर काही कंगाल करतात. असाच एक शेअर सध्या जबरदस्त चर्चेत आहे. केवळा 11 रुपयांपासून शेअर बाजारातील आपला प्रवास सुरू करणाऱ्या या शेअरने केवळ तीन वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
2 / 9
या मल्टीबॅगर शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना विक्रमी परतावा दिला आहे. हा शेअर आहे एमआरएफ (MRF) कंपनीचा. हा शेअर सोमवारी 1 लाख रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. MRF चा शेअर सोमवारी नॅशनल स्टॉक एक्सचेन्जवर (NSE) 99,933.50 रुपयांवर पोहोचला. हा शेअर एक लाख रुपयांपासून केवळ 66.50 रुपयांनी मागे आहे.
3 / 9
एमआरएफचा शेअर सोमवारी ट्रेडिंग सेशन बंद होईपर्यंत 97,750 रुपयांवर बंद झाला होता. यानंतर, मंगळवार शेअरमध्ये पुन्हा तेजी आली. दुपारी 2.30 वाजता MRF च्या शेअरमध्ये 0.09 टक्क्यांची तेजी आली आणि तो 97846.10 रुपयांवर पोहोचला.
4 / 9
​एका वर्षात 31,355 रुपयांहून अधिकची तेजी - एमआरएफच्या शेअरमध्ये सोमवारनंतर मंगळवारीही तेजी दिसून आली. गेल्या एक वर्षाच्या आकडेवारीचा विचार करता, एका वर्षात एमआरएफचा शेअर 31,355 रुपयांनी वधारला आहे. 9 मे 2022 रोजी, MRF च्या शेअरची किंमत 68,578 रुपये एवढी होती, ती 8 मे 2023 रोजी 99,933.50 रुपयांवर पोहोचली आहे. केवळा एकाच वर्षात या शेअरने 31,355.50 रुपयांचा बम्पर परतावा दिला आहे.
5 / 9
फुगे बनवणारी कंपनी अशी बनली MRF - MRF च्या एका शेअरची किंमत एवढी आहे की, आपला पगारही एक शेअर खरेदी करण्यासाठी कमी पडेल. 1946 मध्ये या कंपनीची सुरुवात झाली. ही कंपनी पूर्वी फुगे बनवण्याचे काम करायची. मद्रासमधील रहिवासी असलेल्या केएमएम मप्पिलई यांनी खऱ्या अर्थाने या कहाणीची सुरुवात केली.
6 / 9
मपिलाई यांनी मद्रास रबर फॅक्टरी (MRF) नावाने एक छोटी कंपनी सुरू केली होती. ही कंपनी फुगे बनवत असे. यानंतर 1960 मध्ये त्यांनी टायर बनवण्यास सुरुवात केली आणि आज, MRF ही देशातील सर्वात मोठी टायर निर्माता कंपनी आहे. देशभरात MRF चे 2500 हून अधिक डिस्ट्रीब्यूटर्स आहेत.
7 / 9
आज MRF ही कंपनी 75 हून अधिक देशांमध्ये टायर एक्सपोर्ट करते. महत्वाचे म्हणजे, याकंपनीचे नाव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या बॅटवरही दिसते. आज एमआरएफ ही देशातील सर्वात मोठी टायर निर्माता कंपनी बनली आहे.
8 / 9
​11 रुपांपासून सुरू झाला प्रवास - एमआरएफने 1993 मध्ये शेअर बाजारातील आपल्या प्रवासाला सुरुवात केली, तेव्हा कंपनीचा शेअर केवळ 11 रुपयांना होता. या शेअरमध्ये येणाऱ्या तेजीचे सर्वात महत्वाचे कारण, स्प्लिट न होणे हे आहे. एजंल वननुसार, MRF चा शेअर 1975 पासून ​स्प्लिट झालेला नाही. कंपनीचे मार्केट कॅप 4.17 ट्रिलियनपर्यंत पोहोचले आहे.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा