शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

... तेव्हा 'Telco' मधील कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटांनी केला गुंडाशी सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 1:53 PM

1 / 11
महाराष्ट्र सरकारने नुकतेच उद्योगरत्न पुरस्कार देऊन रतन टाटा यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर, राज्यपाल रमेश बैस यांनीही रतन टाटांच्या कार्याचं कौतुक केलंय.
2 / 11
रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योगसमूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले.
3 / 11
ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.
4 / 11
रतन टाटा यांनी कायमच देश आणि समाज घडवण्यासाठी योगदान दिलंय टेल्को कंपनीच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार देत हजारो कुटुंब उभारली आहेत.
5 / 11
टेल्को कंपनीत नोकरी लागणं हे आजही अनेकांचं स्वप्न असून गावखेड्यातील तरुणांना मुंबई-पुणे दाखवण्याचं आणि तिथं स्थावर करण्याचं काम टाटांनी या कंपनीच्या माध्यमातून केलंय.
6 / 11
रतन टाटा यांच्यासमवेत लाखो कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं भावनिक नातं आहे. कारण, आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचीही ते कुटुंबाप्रमाणेच काळजी घेतात.
7 / 11
टाटांनी यापूर्वी त्यांच्या मुलाखतीमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी एका गुंडासोबत पंगा घेतल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी, टेल्कोतील कामगार-कर्मचाऱ्यांना भडकवणाऱ्या गुंडाला भीक न घालता, त्यांनी कामगारांसाठी टेल्कोच्या प्लँटवर मुक्काम ठोकला होता.
8 / 11
सन १९८० सालची ही घटना असून एक गुंड टाटा मोटर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत. टाटा मोटर्सच्या कामात अडचणी निर्माण करत होता.
9 / 11
कंपनीतील सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्याने फूट पाडणे आणि धमकावण्यासोबतच मारहाणही केली होती. काम बंद करण्याची धमकी देत होता. त्यामुळे, काही कर्मचाऱ्यांनी गुंडाच्या भीतीने काम बंद केले.
10 / 11
या गुंडाला टाटा मोटर्सची युनियन ताब्यात घ्यायची होती आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांना संपवायचा होता, पण रतन टाटांनी असे होऊ दिले नाही.
11 / 11
या गुंडाला टाटा मोटर्सची युनियन ताब्यात घ्यायची होती आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांना संपवायचा होता, पण रतन टाटांनी असे होऊ दिले नाही.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाEmployeeकर्मचारीMumbaiमुंबईbusinessव्यवसायMaharashtraमहाराष्ट्र