शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुलै महिन्यात 'या' बाबींकडे लक्ष द्या, अन्यथा उडेल तारांबळ; खिशावर होईल परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 9:03 AM

1 / 6
दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून बँकिंग तसेच अर्थविषयक बाबींच्या नियमांमध्ये बदल होतात. याचा परिणाम तुमच्या खिशावर तसेच महिन्याच्या नियोजनावर होत असतो. त्यामुळे १ जुलै २०२४ पासून होत असलेले बदल लक्षात घेणे गरजेचे आहे. हे लक्षात न घेतल्यास तुमची तारांबळ उडू शकते.
2 / 6
आयकर विभागाने २०२४-२५ या मूल्यांकन वर्षाचे आयटीआर भरण्यासाठी ३१ जुलै २०२४ ही मुदत निश्चित केली आहे. ही मुदत चुकवल्यास तुम्हाला दंड आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
3 / 6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जुलैपासून सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस)द्वारे केले जावेत, असे निर्देश दिले. फोनपे, क्रेड, बिलडेस्क आदी फिनटेक प्लॅटफॉर्मवर होईल.
4 / 6
अर्थमंत्री निर्मला सीतारामन तिसऱ्या आठवड्यात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ जुलैला बजेट सादर होण्याची शक्यता आहे. 
5 / 6
देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या - रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने त्यांचे रिचार्ज महाग केले आहे. दोन वर्षांत प्रथमच कंपन्यांनी टॅरिफ प्लानच्या किमती वाढवल्या. 
6 / 6
एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीचा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जात असतो. १ जून रोजी सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात केली होती.