There will be relief for those who buy jewelery before Diwali! Gold will be cheaper by Rs. 2500
दिवाळीपूर्वी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा मिळणार! २५०० रुपयांनी स्वस्त होणार सोनं By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 3:28 PM1 / 11गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात घट सुरू असल्याचे दिसत आहे. दोन महिन्यांत सोन्याचा दर २४०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यानंतर देशात सोन्याचा दर ६ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. 2 / 11डॉलरच्या निर्देशांकातील वाढ आणि रोखे उत्पन्नात वाढ हे त्याचे कारण आहे. येत्या काही दिवसांत म्हणजेच दिवाळीपूर्वी सोने आणखी २५०० रुपयांनी स्वस्त होऊ शकते. भारतात धनत्रयोदशीच्या दोन आठवडे आधी दर कमी होऊ शकते.3 / 11देशात सोन्याचा भाव ५५,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतरही सोन्याचा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी अधिक असेल. 4 / 11सध्या सोन्याच्या दराने ६ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर फ्युचर्स १२३ रुपयांच्या घसरणीसह ५८१६० रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान तो ५८१३९ रुपये प्रति दहा ग्रॅम या ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला.5 / 11सोन्याच्या दरात सुमारे २४०० रुपयांची घसरण दिसून आली आहे. २७ जुलै रोजी सोन्याचा भाव ६०,४९९ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. त्यानंतर आज भाव ५८१३९ रुपयांपर्यंत खाली आले.6 / 11दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर, दुपारी १२:३० वाजता चांदीचा भाव ५२ रुपयांच्या किंचित घसरणीसह ७०४९७ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर ट्रेडिंग सत्रादरम्यान तो ७०४५७ रुपये प्रति किलोवर पोहोचला. २७ जुलै रोजी चांदीचे दर ७७,६११ रुपये प्रति किलो होता. म्हणजेच आजच्या खालच्या पातळीच्या तुलनेत चांदी ७,१५४ रुपयांनी कमी झाली आहे.7 / 11दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव घसरताना दिसत आहेत. कॉमेक्सवर सोन्याची भविष्यातील किंमत प्रति ऑन १,८९१.५० डॉलरवर व्यवहार करत आहे. सोन्याच्या स्पॉटची किंमत देखील प्रति औंस १,८७५.४० डॉलरवर स्थिर आहे. चांदीचे दर ०.२२ टक्क्यांनी घसरून २२.६८ डॉलर प्रति औंस झाले आणि चांदीच्या स्पॉटचे भाव ०.३० टक्क्यांनी घसरून २२.४८ डॉलर प्रति औंस झाले. दोघांमध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव १८५० डॉलरच्या खाली जाऊ शकतो. तर चांदी प्रति औंस २१ डॉलरच्या खाली येऊ शकते.8 / 11सोन स्वस्त होण्याचे प्रमुख कारण म्हणजे डॉलर निर्देशांकातील वाढ. आकडेवारीनुसार, सध्या डॉलर निर्देशांक १०६.७० वर व्यवहार करत आहे. जे गेल्या काही आठवड्यात १०२ ते १०३ डॉलरवर होता. तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या निर्देशांकात वाढ झाल्याने सोन्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. 9 / 11दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. याचे कारण डॉलर निर्देशांकात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत FOMC व्याजदरात २५ आधार अंकांनी वाढ करू शकते.10 / 11त्याचा परिणाम डॉलर निर्देशांकावर दिसून येतो. जर डॉलरचा निर्देशांक ११० च्या पातळीवर पोहोचला, तर धनत्रयोदशीपर्यंत भारतातील सोन्याचा भाव सध्याच्या पातळीपेक्षा २५०० रुपयांनी कमी होऊ शकतो. येत्या काळात सोन्याचे दर ५५,५०० रुपयांपर्यंत येऊ शकतो.11 / 11दिवाळीपूर्वी कमोडिटी ट्रेडर्स फेडच्या निर्णयावर लक्ष ठेवतील. फेडने दरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ केल्यास डॉलर इंडेक्स ११० च्या पातळीवर पोहोचू शकतो आणि सोन्याचा भाव ५५-५६ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पोहोचू शकतो. येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव फेडच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications