शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील 'या' 5 बँका NRE खात्यांसाठी देतायेत एफडीवर चांगला रिटर्न, जाणून घ्या किती व्याज मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:03 AM

1 / 8
नवी दिल्ली : एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेसह अनेक भारतीय बँकांनी अलीकडेच एनआरई (NRE) खात्यांसाठी आपल्या मुदत ठेव योजना (फिक्स्ड डिपॉझिट स्कीम) व्याजदर अपडेट केले आहेत. एनआरई खाती ही परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी उघडलेली बँक खाती आहेत, जे विदेशी चलन जमा करतात, ते भारतीय रुपयात काढता येऊ शकते.
2 / 8
एनआरई खाते सिंगल किंवा जॉइंट खाते असू शकते आणि त्यात बचत खाते, चालू खाते आणि एफडी खाते असू शकते. दरम्यान, एनआरई खात्यांचे व्याजदर बँकेवर अवलंबून असतात आणि या खात्यांसाठी किमान कालावधी एक वर्ष असतो. काही सार्वजनिक आणि खाजगी बँकांद्वारे ऑफर केलेल्या एनआरई खात्यांसाठी नवीन एफडी व्याजदरांचे संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या...
3 / 8
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): तुम्ही SBI मध्ये एक ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला 6.50 टक्के ते 7.10 टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.00 टक्के ते 6.75 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाईल.
4 / 8
एचडीएफसी बँक (HDFC) : एचडीएफसी बँकेत 2 कोटींपेक्षा कमी गुंतवणुकीवर 6.60 टक्के ते 7.10 टक्के आणि 2 कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीवर 7.10 टक्के ते 7.75 टक्के व्याज मिळेल.
5 / 8
पंजाब नॅशनल बँक (PNB): पंजाब नॅशनल बँकेने त्यांचे एनआरई फिक्स्ड डिपॉझिट व्याज दर गेल्या वर्षी 5.6 टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत, जे आता 6.5 टक्के ते 7.25 टक्के आहेत.
6 / 8
आयसीआयसीआय बँक (ICICI): विदेशी खात्यांसाठी आयसीआयसीआय बँक मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ग्राहकाला 6.70 टक्के ते 7.10 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.
7 / 8
कॅनरा बँक : कॅनरा बँक एक ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.70 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे.
8 / 8
दरम्यान, तुम्हाला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की एनआरई एफडी दर परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी स्पर्धात्मक व्याजदर देतात, ज्यांना त्यांचे विदेशी चलन भारतात एफडीमध्ये गुंतवायचे आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर आणि कार्यकाळ यांची तुलना करण्याचा सल्ला दिला जातो.
टॅग्स :MONEYपैसाInvestmentगुंतवणूकbankबँक