शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीत विमानाने प्रवास करणार असाल तर 'या' क्रेडिट कार्ड्सद्वारे मिळेल एअरपोर्ट लाउंजमध्ये फ्री एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 1:32 PM

1 / 7
विमानतळावर असलेल्या लाउंजमध्ये जाऊन तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. येथे तुम्ही वर्तमानपत्रे आणि मासिके वाचू शकता. केटरिंग व्यतिरिक्त तुम्ही वायफाय वापरू शकता. दरम्यान, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे मोफत लाउंज अ‍ॅक्सेसचा लाभ घेऊ शकता, हे तुम्हाला माहीत आहे का?
2 / 7
सध्या बाजारात असलेल्या अनेक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ही सुविधा उपलब्ध आहे. सध्या, आम्ही 5 क्रेडिट कार्ड्सबाबात सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही लाउंज अ‍ॅक्सेसची सुविधा मिळवू शकता.
3 / 7
Cashback SBI Card 999 रुपयांच्या वार्षिक शुल्कसह येते आणि तुम्हाला भारतात दरवर्षी 4 एअरपोर्ट लाउंजमध्ये (तिमाहीत एकदा) कॉम्प्लिमेंट्री अॅक्सेस दिला जातो.
4 / 7
Flipkart Axis Bank Credit Card च्या ग्राहकांना वर्षभरात 4 मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये अ‍ॅक्सेस मिळतो. या कार्डचे वार्षिक शुल्क 500 रुपये आहे.
5 / 7
Axis Bank Ace क्रेडिट कार्ड 999 रुपये वार्षिक शुल्कासह येते. कार्डधारकाला दरवर्षी 4 मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये अ‍ॅक्सेस मिळतो.
6 / 7
HDFC Bank Millennia Credit Card 1000 रुपयांच्या वार्षिक शुल्कासह येते. या कार्डद्वारे, तुम्ही वर्षातून 8 वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये अ‍ॅक्सेस करू शकता. एका तिमाहीत जास्तीत जास्त 2 वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये अ‍ॅक्सेस करू शकतो.
7 / 7
ICICI Coral RuPay Credit Card 500 रुपयांच्या वार्षिक शुल्कासह येते. कार्डधारक एका तिमाहीत एकदा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये अ‍ॅक्सेस करू शकतात.
टॅग्स :businessव्यवसायDiwaliदिवाळी 2022