शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 4:45 PM

1 / 6
आजच्या काळात सोशल मीडिया स्टेटस इतकचं तुमच्या क्रेडिट स्कोअरला महत्त्व आलं आहे. तुम्ही कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला तर बँका पहिल्यांदा तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजावर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड सहज मिळू शकते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर कर्ज मिळणे कठीण होते. मात्र, क्रेडिट स्कोअर संदर्भात अनेक अफवाही बाजारात पसरल्या आहेत. याच अफवा आज दूर करण्याचं काम आपण करणार आहोत.
2 / 6
उत्पन्नाचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? : तुमचे उत्पन्न किंवा पगार किती आहे याचा क्रेडिट स्कोअर रिपोर्टशी काही संबंध नाही. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत नाही.
3 / 6
कमी क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मिळत नाही : बँका अनेक बाबी लक्षात घेऊन कर्ज देतात. क्रेडिट स्कोअर हा त्यापैकी एक आहे. कमी क्रेडिट स्कोअर असतानाही तुम्ही कर्ज घेऊ शकता. परंतु, बँका तुम्हाला जास्त व्याज आकारते.
4 / 6
जास्त क्रेडिट कार्ड वापरल्यास क्रेडिट स्कोअर सुधारतो : तुम्ही नवीन क्रेडिट खात्यासाठी अर्ज करता तेव्हा बँक तुमचा क्रेडिट रिपोर्ट काढते. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत नाही. तुम्ही वेळेवर बिले भरत आहात की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे.
5 / 6
जुनी खाती बंद केल्याने क्रेडिट स्कोअर सुधारतो का? : जुने क्रेडिट कार्ड किंवा बँक खाती बंद केल्याने तुमचा क्रेडिट आणि आर्थिक व्यवहाराचा इतिहास कमी होतो, ज्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दीर्घ क्रेडिट हिस्ट्री तुमचे आर्थिक व्यवहार आणखी स्पष्ट करते.
6 / 6
एखाद्या वेळेस बिस उशीरा भरल्यास चालते का? वास्तविक तुम्ही उशीरा बिल भरल्यास त्याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोअरवर होत असतो. त्यामुळे वेळेच्या आधीच भरणा करायला हवा.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकMONEYपैसा